Maharashtra Politics । राज्यातील जनतेला राजकीय भूकंपाची (Politics in Maharashtra) सवय झाली आहे, असेच म्हणावे लागेल. कारण मागील काही महिन्यांपासून राज्याचे राजकारण वेगवेगळे वळण घेत आहे. अशातच आता राज्यात पुन्हा अनपेक्षित राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा भाजपच्या (BJP) बड्या मंत्र्यांने केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. (Latest marathi news)
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याकडून जळगावमधील काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार डॉ. उल्हास पाटील (Ulhas Patil) यांच्याविरोधात सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर आता उल्हास पाटील बुधवारी मुंबईमध्ये भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहे. या चर्चांवर उत्तर देताना भाजपचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी मोठं भाकीत केले आहे.
“उल्हास पाटील यांच्या भाजप प्रवेशाबद्दल माहिती नाही. हा भूकंप कसा होतो याची माहिती नाही. पण मी बोललो होतो त्या पद्धतीने सगळ्यात मोठे भूकंप म्हणजे तुम्हाला अपेक्षित नसतील असे मोठे राजकीय भूकंप हे पुन्हा राज्यात होणार आहेत”, असे संकेत गिरीश महाजन यांनी दिले आहेत. गिरीश महाजन यांनी याआधीही तसे संकेत दिले आहेत.