Girish Mahajan । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्याबाबत एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. गिरीश महाजन काय बोलतात, काय करतात हे मी बोलू इच्छित नाही. त्यांच्यासाठी ते अडचणीचं ठरेल, असं वक्तव्य शरद यावर यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
शरद पवार यांना नेमकं काय सूचवायचं आहे? असा प्रश्न उपस्थित केला आहे. शरद पवारांनी जळगाव या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार रॅलीत भाग घेतला यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केले आहे.
Sharad Pawar । निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांनी केला सर्वात मोठा दावा; म्हणाले…
विरोधकांचा सुपडा साफ होईल असा दावा गिरीश महाजन यांनी केलाय. याबाबत तुमचं मत काय? असा प्रश्न शरद पवारांना पत्रकारांनी विचारला यावर उत्तर देत शरद पवार म्हणाले, “महाजन काय बोलतात आणि करतात यावर मी भाष्य करू इच्छित नाही. ते फार अडचणीचं असेल. व्यक्तीगत कुणासंबंधात मी उत्तर देऊ इच्छित नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत.
Baba Ramdev । ब्रेकिंग! बाबा रामदेव यांना सुप्रीम कोर्टाचा पुन्हा मोठा धक्का