Girish Mahajan । मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत अजूनही कोणताच तोडगा निघाला नाही. यामुळे मनोज जरांगे पाटील हे 20 जानेवारी रोजी मुंबईत उपोषण करणार असल्याची माहिती मिळत आहे. स्वतःत मनोज जरांगे पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी सर्व मराठा बांधवांना मुंबईला येण्याच आव्हान देखील केले आहे. मात्र आता मराठा आरक्षणाबाबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
जरांगे पाटील यांना मुंबईला येण्याची वेळ कधीही येणार नाही. त्यापूर्वीच मराठा समाजाला न्याय मिळेल असं वक्तव्य ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केल आहे. सध्या त्यांच्या वक्तव्याच्या सगळीकडे जोरदार चर्चा चालू आहेत. क्युरेटिव्ह पीटिशन मान्य झाली असून त्याचा रिपोर्ट आला की, आम्ही विधानसभेचे सत्र घेऊन मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत. सरकार प्रामाणिकपणे आणि वेगाने काम करीत आहे. महिनाभरात हा प्रश्न मार्गी लागेल असे देखील गिरीश महाजन म्हणाले आहेत.
Abhishek Bachchan । “त्यावेळी अंगावर कपडेही..” अभिषेक बच्चन याने सांगितलं ‘तो’ अनुभव
त्याचबरोबर पुढे ते म्हणाले, “मराठा समाजाला मुंबईमध्ये येण्याची वेळ येणार नाही, तोपर्यंतच न्याय मिळेल सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून न्याय मिळेल. त्याचबरोबर सरकारच्या माध्यमातून न्याय मिळेल जरांगे पाटील किंवा मराठा समाजाला मुंबईमध्ये येण्याची वेळ येणार नाही असं गिरीश महाजन म्हणाले आहेत.
Maratha Reservation । ब्रेकिंग न्यूज! मनोज जरांगेंची सभा घेणाऱ्या ११ आयोजकांवर गुन्हा