रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मधोमध अडकली मुलगी, आरपीएफ जवानांनी वाचविले प्राण; पाहा VIDEO

Girl trapped between train and platform, rescued by RPF jawans; Watch the VIDEO

सोशल मीडिया हे मनोरंजनाचे एक नवे माध्यम आहे. यावर अनेक व्हिडिओ कायम व्हायरल होत असतात. इन्स्टाग्राम, फेसबुक व ट्विटर या प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अनेक युझर्स व्हिडीओ शेअर करत असतात. यामध्ये विविध प्रकारच्या व्हिडिओजचा समावेश असतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल ( Viral video) होतोय. रेल्वे स्टेशनवर घडलेला एक धक्कादायक प्रकार या व्हिडीओमध्ये पहायला मिळत आहे. आंध्रप्रदेश येथील दुव्वाडा रेल्वे स्टेशनवर ही घटना घडली आहे.

10 मिनिटांत घरी बसल्या बनवा पॅनकार्ड; ऑनलाइन पॅनकार्ड तयार करण्याची सोपी पद्धत

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दुव्वाडा रेल्वेस्टेशनवर ( Duwwda Railway Station) एक विद्यार्थीनी रेल्वे मधून उतरत असताना रेल्वे व प्लॅटफॉर्म मध्ये असलेल्या अंतरात अडकली होती. यावेळी तत्परता दाखवत रेल्वे पोलिसांनी या विद्यार्थिनीला लगेच बाहेर काढले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलीचे नाव शशिकला असून ती दुव्वाडाच्या सायन्स कॉलेजमध्ये एमसीएचे शिक्षण घेत आहे. रेल्वेमधून उतरत असताना शशिकला पॅसेंजरच्या डब्यात आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकली.

गोकुळने दूध दरात केली ‘इतक्या’ रुपयांनी वाढ

यावेळी अडकल्याने तिला सतत वेदना होत होत्या. म्हणून ती व्हायरल झालेल्या व्हिडीओत जोरात रडताना दिसत आहे. दरम्यान तिचा आरडाओरडा ऐकून रेल्वे स्थानक अधिकाऱ्यांनी तात्काळ रेल्वे चालकाला रेल्वे थांबवण्याचे आदेश दिले. यावेळी आरपीएफ जवानांनी पीएफ कोपिंग तोडून तिला तेथून बाहेर काढले. त्यांच्या या बचावकार्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Viral Video: हिवाळ्यात अंघोळ करताना थंडी वाजू नये म्हणून पठ्ठ्याने पाण्यातच लावली आग

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *