
मुंबई: ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्यासह भोपाळच्या काली बाड़ी मंदिरात पोहोचल्या. यावेळी अभिषेक बच्चन सोबत फोटो काढणाऱ्या चाहत्यांना जया बच्चन यांनी चांगलंच सुनावलं आहे. जया बच्चन यांच उग्र रूपातील एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामुळे चाहत्यांचा संताप होत आहे.
अभिषेक बच्चन मंदिरामध्ये उपस्थित होता, त्यावेळी त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती, यामध्ये दोन तरुणींनी गजबजलेल्या मंदिरात अभिषेक बच्चनकडे सेल्फी मागितला तेव्हा त्याने होकार दिला. पण , यानंतर सेल्फी घेणाऱ्यांची गर्दी जास्तच वाढली.
उर्फीचा टॉपलेस व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी घेतला समाचार; पाहा VIDEO
Jaya Bachchan schools fans trying to click selfies with @juniorbachchan at Kali Bari temple in #Bhopal But jaya gets always angry on fans ..why's@SrBachchan ji..@ianuragthakur @Anurag_Office @mybmc @filmindependent @MumbaiCityFC pic.twitter.com/hQE3rh7MBf
— Gajendra Singh Chouhan (GaJJu) (@GajjuChouhan91) October 5, 2022
नंतर अभिषेकच्या भोवती गर्दी जास्तच वाढू लागली. अभिषेक अनियंत्रित गर्दीत अडकला, त्यावेळी जयाबच्चन क्रोधात म्हणाल्या, “तुम्ही लोकं तरी सोडा ना? लाज वाटत नाही का तुम्हाला?” त्यानंतर काही काळ वातावरण चांगलेच तापले. नंतर अभिनेत्याच्या गार्डने त्याला गर्दीतून सुखरूप बाहेर काढले.
कुत्र्याचा पाठलाग करत बिबट्या घुसला घरात; पण शेतकऱ्याने केला जेरबंद