दिल्ली: दिल्लीच्या (Delhi) कॅनॉट प्लेसमध्ये दररोज हजारो लाखो लोक पाहायला मिळतात. या कॅनॉट प्लेसमध्ये (Connaught Place) खरेदीपासून ते खाण्या-पिण्यापर्यंत सगळ्या गोष्टी मिळतात. कॅनॉट प्लेस ही जागा तरुण-तरुणींसाठी फिरण्यासाठी फेमस जागा आहे. इतकंच नाही तर बरेच लोकं येतात आणि छान कलाकारी दाखवत व्हिडिओही (video) काढतात.
Viral Video: जिमच्या इक्विप्मेंटवरून दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी
दरम्यान अशातच आता दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमधून एक व्हिडीओ व्हायरल झालाय. व्हिडीओत मुलगी इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर वाटत होती. तिने जम्पिंग जॅकची दोरी (Jumping jack rope) आपल्या हातात घेतली. मुलीने आपल्या दोरीने काही सेकंदात असे पराक्रम केले, ज्याचा अंदाज कोणालाही आला नसेल.
मोठी बातमी! ३५ साखर कारखान्यांनी घेतली ऊस गाळप सुरू करण्याची परवानगी
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मुलीचा हा पराक्रम पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झाली होती. हा ट्रेंडिंग व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. हा व्हिडिओ priyu_skipper01 या नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. नेटकरी यावर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
चक्क घराची भिंत पाडताना सापडली तब्बल 160 हून अधिक चांदीची नाणी, पुढे झालं अस की…