
नाशिकमधील (Nashik) गंगापूर रोडवरील एका महाविद्यालयात (College) विद्यार्थिनींमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. चार मुलींमध्ये जोरदार भांडणे झाली आहेत. याचा व्हिडीओ (Video) देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या हाणामारी करणाऱ्या विद्यार्थिनी अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली आहे.
या विद्यार्थिनींमध्ये नेमकं कोणत्या कारणाने एवढं भांडण झालं हे अजून समजू शकलेलं नाही. पण सोशल मीडियावर (Social media) या मुलींच्या हाणामारीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा सर्व प्रकार महाविद्यालयाच्या परिसरात घडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या मुलीची मारहाण चालू होती त्यावेळी शिक्षक किंवा कर्मचारी (teachers or staff) हा सर्व प्रकार घडत असताना कुठे होते असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.
सीताफळाचे दर भिडले गगनाला; सफरचंदापेक्षा जास्त मिळतोय भाव
यामध्ये लक्षात येते की महाविद्यालयाच्या परिसरात जमलेले विदयार्थी तिथं उभा राहून व्हिडीओ बनवत आहेत. पण कोणी विद्यार्थिनींमध्ये सुरू असलेले भांडण सोडवण्याचा प्रयत्न केलेला नाही.
धक्कादायक! तंबाखू खाण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने घेतला आईचा जीव