केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेअंतर्गत मुलींना मिळणार ५१ हजार रुपये; असा करा अर्ज

Girls will get 51 thousand rupees under this scheme of Central Government; Apply like this

शेतकरी,वृद्ध, विधवा किंवा विद्यार्थी असो समाजातील प्रत्येक घटकासाठी मोदी सरकार (modi government) वेगवेगळ्या योजना राबवत असतात. दरम्यान या योजनांचा (scheme) देखील तितकाच फायदा होताना दिसत आहे. दरम्यान केंद्र सरकारमार्फत देशातील मुलींसाठीही एक खास योजना राबवली जाते, ती म्हणजे, ‘प्रधानमंत्री शादी शगुन योजना’. (Pradhan Mantri Shadi Shagun Yojana)

Raj Thackeray: राज ठाकरे पुढील ५ दिवस विदर्भ दौऱ्यावर;‘असे’ असेल मनसेचं ‘मिशन विदर्भ’

सध्याच्या परिस्थितीत अल्पसंख्याक समाजातील म्हणजेच विशेषतः मुस्लिम समाजातील (Muslim community) मुलींच्या उच्च शिक्षणाची स्थिती अत्यंत वाईट आहे. म्हणून या मुलींची सुरक्षा, पोषण व त्यांच्या उच्च शिक्षणासाठी मोदी सरकारने प्रधानमंत्री शादी शगुन योजना आणली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 ऑगस्ट 2017 रोजी अल्पसंख्याक मंत्रालयाने ठराव मंजूर केल्यानंतर ही योजना सुरू केली.

Narendr Modi: कॅमेरा लेन्सवरील कव्हर न काढताच मोदीजी काढत होते फोटो? TMC नेत्याने शेअर केला फोटो, भाजपाने दिल प्रत्युत्तर

असा मिळणार योजनेचा लाभ

फक्त अल्पसंख्याक समाजातील मुलींनाच‘प्रधानमंत्री शादी शगुन योजने’चा लाभ मिळतो. तसेच मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन व पारसी या अल्पसंख्यांक समुदायातील मुलींसाठी शालेय स्तरावर ‘बेगम हजरत महल’ ही राष्ट्रीय शिष्यवृत्ती दिली जाते. महत्वाची बाब म्हणजे अल्पसंख्यांक समाजातील मुलींना लग्न करण्यापूर्वी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या मुलींना या योजनेअंतर्गत केंद्र सरकारमार्फत 51 हजार रुपये दिल्या जाते.

Aditya Thackeray: महाराष्ट्र म्हणजे पाकिस्तान आहे का? वेदांता प्रकल्पावरून आदित्य ठाकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल

असा करा योजनेसाठी अर्ज

‘शादी शगून’ योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. दरम्यान ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील वेबसाईटवर जा..https://www.india.gov.in/schemes-maulana-azad-education-foundation या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा. अर्ज केल्यानंतर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *