दिल्ली : गेल्या वर्षांपासून रशिया आणि युक्रेन युद्धात अनेक वाईट परिणाम झालेले आपल्याला दिसत आहे. या युद्धामुळे युक्रेनच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. पण रशियाचा किती नुकसान झाले हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण रशियाच्या सरकारच्या एका घोषणेमुळे युक्रेन युद्धात रशियाचं मोठं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. आता रशियाच्या महिलांना एक अजब ऑफर दिली आहे. कोरोनामध्ये आणि नंतर युद्धामध्ये रशियाची लोकसंख्या कमी झाली आहे. ती पुन्हा वाढवण्यासाठी रशियाच्या सरकारने देशाच्या महिलांना आवाहन केलं आहे!
२०२०पासून जगातील इतर देशांप्रमाणेच रशियात देखील करोनानं थैमान घातलं. करोनामुळे रशियामध्ये आत्तापर्यंत लाखो नागरिकांचा झाला आहे. आणि त्याचबरोबर युद्धामध्ये एका अंदाजानुसार जवळपास ५० हजार रशियनांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये रशियन सैन्य आणि सामान्य नागरिकांचा देखील समावेश आहे. लोकसंख्येत झालेली घट पाहता आता रशियन सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
पुतिन यांचं आवाहन!
देशातील लोकसंख्या पुन्हा एकदा संतुलित होण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी रशियातील महिलांना एक वेगळाच आवाहन केले आहे. रशियाची लोकसंख्या वाढवण्यासाठी महिलांनी किमान १० मुलांना जन्म द्यावा अशी विनंती पुतिन यांनी रशियन महिलांना केली आहे. महिलांना यासाठी आर्थिक स्वरुपात बक्षीस देखील जाहीर करण्यात आले आहे.
पुतिन सरकारने जाहीर केलेल्या बक्षीसानुसार एखाद्या महिलेले १० मुलांना जन्म दिला आणि ती सर्व आपत्य जिवंत असतील तर त्या महिलेला दहाव्या मुलाच्या वाढदिवसादिवशी त्या महिलेला १० लाख रशियन रुबल अर्थात भारतीय चलनात जवळपास १३ लाख रुपये देण्यात येतील.