मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यात याव्या अशा सूचना परिवहन जारी करण्यात आल्या आहेत. एसटी कामगार संघटनेच्या बैठकीत एकनाथ शिंदेंनी सूचना दिल्या आहेत. परिवहन खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष सिंह यांना फोनवरून कर्मचाऱ्यांचे डीएदेण्याचे आदेश देण्यात आलेत. दरम्यान एसटी कर्मचारी संघटनांना मुख्यमंत्र्यांनी महागाई भत्ता देण्याचं आश्वासन दिलं होतं.
Rohit Pawar: रोहित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला, राजकीय चर्चाना उधाण
काल शुक्रवारी रात्री सह्याद्री अतिथीगृहावर एक बैठक झाली. यावेळी या बैठकीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसंच वाढत्या महागाईत आर्थिक मदतीचा हातभारही लागेल, असा विश्वास देखील व्यक्त केला जात आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप केला होता. त्यामध्ये एसटीच विलीनीकरण करावं ही महत्वाची मागणी एसटी कामगार संघटनांनी केली होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसटीच्या संपावर देखील तोडगा काढण्यात आला होता. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करून त्यांच्या अन्य मागण्या देखील पूर्ण केल्या होत्या. मात्र विलिनीकरणाची महत्वाची मागणी मान्य करण्यात आली नव्हती. मात्र संपावर तोडगा काढण्यासाठी त्यांच्या महागाई भत्त्यात देखील वाढ केली गेली होती.
Thackeray-Fadanvis: राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट; चर्चांना उधाण
दरम्यान, मागच्या काही दिवसांपूर्वी एसटी कर्मचारी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे काही मागण्या करण्यात आल्या होत्या. महागाई भत्ता देण्यात यावा, कर्मचाऱ्यांचं वेतन निश्चित केलं जावं, याचसोबत अन्य मागण्यांवर लक्ष वेधण्यात आलं होतं. काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एसटी कर्मचारी संघटनेची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आता एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देण्याबाबतच्या सूचनामुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
Thackeray-Fadanvis: राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट; चर्चांना उधाण