सोशल मीडियावर (social media) कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्याची तरुण पिढी कधी काय करेल याचा अंदाज आपण लावूच शकत नाही. फेब्रुवारी महिना म्हटलं की, सोशल मीडियावर प्रेमाविषयी अनेक पोस्ट व्हायरल होताना दिसतात. असच एक पत्र सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत आहे.
मोठी बातमी! आमदार शहाजीबापूंच्या ताफ्यातील पोलीस गाडीचा भीषण अपघात; १ जागीच ठार
नोकरी नाही म्हणून मी माझ्या प्रियकराला प्रपोज करू शकत नाही, असे म्हणत बिहार (Bihar) येथील तरुणीने थेट उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) यांना पत्र लिहीले आहे. सध्या या पत्राची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.
महावितरण अधिकाऱ्याशी फाडफाड इंग्रजीमध्ये बोलणाऱ्या शेतकऱ्याला मिळाला मीटर!
पत्र लिहीताना तरूणीने लिहीले की, प्रिय तेजस्वी यादव, तुम्हाला माहित आहे का, मी सध्या खुप टेन्शनमध्ये आहे. कारण मी प्रभात नावाच्या एका मुलावर एकतर्फि प्रेम करते. पण माझ्याकडे नोकरी नाही. आणि नोकरी लागल्यावर मी प्रभातला प्रपोज करेल असं ठरवलं आहे. पण नोकरी मिळत नाही.
कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी थेट देशाचे गृहमंत्री अमित शाह उतरणार मैदानात!
तसेच, तुम्ही देखील लव मॅरेज केलं आहे. पण आमच्या लग्नावर बेरोजगारीच संकट आलं आहे. अफेअरच्या वयात करंट अफेअर वाचत आहे. मात्र, नोकरीसाठी जागा देखील निघत नाहीत. जागा निघाल्या तर पेपर लिक होतात. यामुळे यावर्षी देखील व्हॅलेंटाईन डे सुद्धा निघून जाईल. त्यामुळे नोकरीच काहीतरी जुगाड करुन द्या नाही तर मी दुसर्यासोबत पळुन जाईल. असं या तरुणीने म्हंटल आहे.
माध्यमांशी बोलताना ढसाढसा रडत राखी सावंत म्हणाली; “मैं एक जिंदा लाश हूं”
यापुढे तिने लिहीले की, मी परिक्षेचा अभ्यास करत आहे. आणि दुसरीकडे माझे वडिल माझ्या लग्नाची तयारी करत आहेत. माझ्या सोबतच्या सर्व मुलींची लग्न झाली आणि त्याना मुलं देखील झाली आहेत. हे सर्व पाहून मला देखील खुप वाईट वाटत.
प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीची आई ढसाढसा रडत म्हणाली, “आमचा मुलगा रोज…”