Maratha reservation । मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरु केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आश्वासनानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले, परंतु आरक्षण मिळेपर्यंत ते आंदोलनस्थळावरून (Manoj Jarange Patil Protest) हटणार नाहीत. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मराठा आरक्षणासाठी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. (Latest Marathi News)
Sambhaji Bhide । “… तर जेलमध्ये टाकून चक्की पिसायला लावू”; ‘या’ बड्या नेत्याचा संभाजी भिडेंना इशारा
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा होत असताना धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ध्वजारोहणावेळी मराठा वनवासी यात्रेचे संयोजक सुनील लागणे (Sunil Lagane) आणि प्रताप कांचन पाटील (Pratap Kanchan Patil) यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी सुनील लागणे आणि प्रताप कांचन पाटील यांना ताब्यात घेतले आहे. यावेळी त्यांनी सरकारविरोधातही जोरदार घोषणाबाजी केली.
त्यामुळे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. राज्यात अजूनही मराठा समाजाच्या आरक्षणाचा पेच सुटला नाही. अजूनही याच मुद्द्यावरून मराठा समाजात असंतोष पाहायला मिळत आहे. सरकारने एक महिन्याचा कालावधी दिला असला तरी मराठा समाजाच्या मागण्या मान्य होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Icc World Cup । भारतीय संघात मोठा बदल! स्टार खेळाडू अचानक बाहेर, नेमकं कारण काय?