शेतकरी शेतीला (agriculture) पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय करतात. आणि महत्वाचं म्हणजे पशुपालन (animal husbandry) व्यवसायाची सगळी मदार ही दूध उत्पादनावर अवलंबून आहे. आर्थिक उत्पन्न वाढवण्याचा एक समृद्ध मार्ग म्हणजे वाढीव दुध उत्पादन (milk production) परंतु वाढीव दूध उत्पादनासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे पशुंचे आहार व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्थापन तसेच त्यांचे पाण्याचे व्यवस्थापन खूप महत्त्वाचे आहे. परंतु आपण जो काही जनावरांना आहार देतो तो पौष्टिक घटकांनी समृद्ध असणे तेवढेच गरजेचे आहे. दरम्यान जनावरांच्या दूध उत्पादन वाढीत महत्त्वपूर्ण ठरू शकणाऱ्या काही गवताबद्दल जाणून घेऊया.
तुळशीच्या पानांचे ‘हे’ उपयोग तुम्हाला माहीत आहेत का? अनेक आजार होतात झटक्यात दूर
दूध उत्पादन वाढीसाठी उपयुक्त गवताच्या ‘या’ तीन जाती
1) जीरका गवत- जिरका गवत हे दूध वाढीसाठी खूप महत्त्वाचे गवत आहे. दरम्यान या गवताची लागवड देखील खूप सोपी आहे. बरसीम गवताच्या तुलनेत विचार केला तर याला कमी पाण्याची आवश्यकता असते. जीरका गवत जनावरांसाठी उपयुक्त असून त्याचा लागवडीचा काळ हा ऑक्टोबर ते नोव्हेंबर हा असतो.
कपल फोटोशूटसाठी सासू-सासऱ्यांनी केली मदत! व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क
2) बरसिम गवत- दूध वाढीसाठी बरसिम गवत हे जनावरांसाठी सर्वोत्तम आणि पौष्टिक असा आहार आहे. या गवतामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे जनावरांचे पचन क्रिया देखील यामुळे व्यवस्थित राहते. तसेच हे स्वादिष्ट असल्याने जनावरे गवत मोठ्या आवडीने खातात.
3) नेपियर गवत- नेपियर गवत हे उसासारखे दिसते. त्यामुळे जनावरांसाठी हे गवत अतिशय पौष्टिक मानले जाते आणि यामुळे जनावरे दूध जास्त देतात. हे गवत लागवड केल्यानंतर कापणीचा कालावधी कमीत कमी 50 दिवसांचा असून शेतकरी बांधवांना गुरांसाठी लवकर पौष्टिक चारा उपलब्ध होतो.
Airtel च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! फॅमिली प्लॅन लाँच, जाणून घ्या किंमत