महाराष्ट्रात वडापाव हा पदार्थ विशेष प्रसिद्ध आहे. राज्यातील चौका-चौकांत वडापावचे गाडे व हॉटेल दिसतात. दिवसेंदिवस वडापावचे नवीन नवीन ब्रँड देखील नावारूपाला येत आहेत. सकाळचा नाश्ता असो किंवा रात्रीचे जेवण वडापाव सगळीकडे चालून जातो. मात्र तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, अभिनेत्री तेजस्विनी पंडितने ( Tejaswini Pandit) वडापाव खाणे बंद केले आहे.
मोठी बातमी! भर सभेत गोळ्या मारलेले आरोग्यमंत्री नबा दास यांचे निधन
‘पटलं तर घ्या’ या सुप्रसिद्ध कार्यक्रमामध्ये तेजस्विनीने याबाबत वक्तव्य केले आहे. यावेळी ‘मला भूक लागली आहे आणि मला वडापाव ( Vadapav) खायचा आहे’ हे वाक्य तेजस्विनीला वेगवेगळ्या पद्धतीने बोलण्यास सांगितले होते. त्यावेळी तेजस्विनीने भावूक होत आपण वडापाव खाणे का सोडले ? याचा खुलासा केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
‘आपल्या एका मित्रामुळे वडापाव खाणे सोडले’ असे तेजस्विनी पंडितने या कार्यक्रमात सांगितले आहे. मात्र कोणत्या मित्रामुळे वडापाव खाणे सोडले ? याची माहिती तेजस्विनीने यावेळी दिली. तेजस्विनी सध्या ‘बांबू’ या अगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून तिने पहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.