
भारतीय कृषी अनुसंधान परिषद व राष्ट्रीय अजैविक स्ट्रेस प्रबंधन संस्थान माळेगाव बारामती यांच्या पंधराव्या स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं. यात शेती संबंधित उल्लेखनीय काम केलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी पद्मश्री डॉ सुभाष पाळेकर यांच्या SPK शेती पद्धतीने नैसर्गिक शेती करणारे शेतकरी श्री मिलिंद सावंत व त्यांच्या आई समिंद्राताई सावंत यांना सन्मानित करण्यात आले.
खळबळजनक! घरात बसलेल्या आलिया भट्टचे दोघांनी गुपचूप काढले प्रायव्हेट फोटो
मागील 9 वर्षा पासुन पद्मश्री डॉ सुभाष पाळेकर यांच्या SPK शेती पद्धतीचा अवलंब करून त्यांच्या मार्गदर्शनाने नैसर्गिक शेती करणे तसेच परिसरातील शेतकऱ्यांनाही नैसर्गिक शेती करण्यासाठी मार्गदर्शन करने त्यांना प्रोत्सहन देणे, नैसर्गिक शेतीतील उत्पादित शेतमालाला थेट बाजारपेठ मिळवून देणे यासाठी उत्पादक शेतकरी व ग्राहक यांच्यात समन्वय साधून योग्य बाजारभाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे तसेच देशी / गावरानी भाजीपाला बियांचे 120 प्रकार जतन, सावर्धन करून देशी बिज बँक बनवून त्याच्या माध्यमातून प्रचार व प्रसार करत असतात.
कैद्यांना मिळणार सुखाची झोप, तुरूंगात मिळणार बेड आणि उशी
अशा प्रकारे शेती क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्यामुळे त्यांना भारतीय कृषी अनुसंधान व संशोधन संस्थेनकडून सहकुटुंब सन्मान पत्र व स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय कृषी अनुसंधान व संशोधन संस्थेचे संचालक डॉ. रेड्डी, डॉ. कुऱ्हाडे, डॉ. गांधी, डॉ. तायडे, डॉ. निर्मले, निवडक शेतकरी व इतर मान्यवर उपस्थित होते.
मोठी बातमी! अग्निवीर भरतीमध्ये आता ‘या’ शाखेतील विद्यार्थीदेखील करू शकणार अर्ज