
Viral Video । देशात मेट्रोचे (Metro) जाळे पसरले आहे. असंख्य प्रवासी मेट्रोने प्रवास करत असतात. दरम्यान, मेट्रोमधील सतत काही ना काही व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ हास्यास्पद असतात तर काही संतापजनक असतात. काही व्हिडिओ पाहून तर नेटकरी डोक्यालाच हात लावतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Metro Viral Video) होत आहे. (Latest Marathi News)
दिल्ली मेट्रोमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की मेट्रोच्या डब्यात खूप गर्दी आहे. प्रवासी उभे राहून प्रवास करत आहेत. अशातच एका प्रवासी महिलेने तेथे उभ्या असणाऱ्या जोडप्याचा हात पकडून एकमेकांच्या गालावर चिमटे काढल्याने अस्वस्थ झाले. ती अचानक त्या मुलीला शिव्या घालू लागते. (Social media viral video)
पहा व्हिडीओ व्हायरल
यानंतर ती मुलगीही त्या महिलेला उत्तर देऊ लागते, ‘तुला काय प्रॉब्लेम आहे?’ यावर ती महिला म्हणते, ‘मी हे सांगत आहे. बरं वाटत नाहीये बेटा, तुला जर रोमान्स करायचा असेल तर बाहेर जाऊन कर.’ यानंतर इतर प्रवासीही त्या जोडप्याला समजावू लागतात. बाहेर जा आणि हे सर्व करा. सध्या हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. नेटकरीही त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देऊ लागले आहेत.
Maratha Reservation । मराठा आरक्षणाचा तिसरा मुद्दा ठरणार डोकेदुखी? जाणून घ्या नेमकं प्रकरण
यापूर्वीही मेट्रोमध्ये महिलांची हाणामारी
दरम्यान, सतत मेट्रोमध्ये घडत असणाऱ्या घटनांचे व्हिडिओ वारंवार समोर येत असतात. नुकताच मेट्रोचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. यामध्ये सीटवर बसण्यावरून दोन महिलांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर एका महिलेने दुसऱ्या महिलेला मोठ्या आवाजात ओरडून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली होती.
Kishori Pednekar । मोठी बातमी! किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाढ, दाखल झाला गुन्हा