Goa Murder Case । बेंगळुरूस्थित एआय स्टार्टअप कंपनी माइंडफुल एआय लॅबची सीईओ सुचना सेठला मुलाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. गोव्यातील हॉटेलमध्ये मुलाचा गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे. बुधवारी (10 जानेवारी) सुचना सेठचीही मानसिक चाचणी करण्यात आली आहे. कथित आरोपी सूचना हिने आपल्या मुलाची हत्या करण्यापूर्वी तिचा घटस्फोटित पती व्यंकटरमण पीआर याला मेसेज पाठवल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
आम आदमी पार्टीच्या वतीने सोमेश्वर कारखान्याला निवेदन, ऊस वेळेत तोडण्याची केली मोठी मागणी
या मेसेजमध्ये तिने रविवारी (७ जानेवारी) बेंगळुरूमध्ये आपल्या मुलाला भेटणार असल्याचे सांगितले होते. वैवाहिक संबंधात दुरावा निर्माण झाल्याने कोर्टाच्या निर्णयानंतर दोघेही वेगळे झाले होते. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, आरोपी सुचना सेठचे 6 जानेवारी ते 10 जानेवारी दरम्यान गोव्यातील एका हॉटेलमध्ये बुकिंग होते, परंतु कदाचित तिला तिच्या पतीने आपल्या मुलाला गोव्यातील हॉटेलमध्ये भेटावे असे वाटत नव्हते. न्यायालयाच्या आदेशानंतर, 4 वर्षांच्या मुलाचा ताबा आईला (सुचना सेठ) देण्यात आला आणि वेंकटरामन यांनाही मुलाला भेटण्याची परवानगी देण्यात आली.
Ajit Pawar । अजित पवार पुन्हा शरद पवार यांना मोठा धक्का देणार; हालचालींना वेग
बेंगळुरूमध्ये मुलाला भेटण्यासाठी पतीला मेसेज पाठवला
तत्पूर्वी, सुचनाने 7 जानेवारीला व्यंकटरमण याला बेंगळुरूमध्ये मुलाला भेटण्यासाठी मेसेज केला होता. त्यावेळी व्यंकट बेंगळुरूमध्येच होता. व्यंकटरमण यानीही माहितीच्या मेसेजला उत्तर दिले आणि ठरवून दिलेल्या ठिकाणी पोहोचला, मात्र सुचना सेठ त्या ठिकाणी पोहचलीच नाही.
Chandrakant Patil । मोठी बातमी! विद्यार्थ्यांनी पुण्यात अडवली चंद्रकांत पाटील यांची गाडी