भारतात विविध दिवस साजरे केले जातात. आज 26 संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का ? संविधान दिनासोबतच आज ‘जागतिक दूध दिवस’ ( Milk Day) देखील आहे. आपल्या संस्कृतीमध्ये दूध हे पंचामृतांपैकी एक मानले जाते. कारण चांगल्या आरोग्यासाठी दुधाचे सेवन हे फायदेशीर असते. दुधात असणाऱ्या पोषक अन्न घटकांमुळे डॉक्टर सुद्धा अनेकदा दूध पिण्याचा सल्ला देतात. बहुतेक लोक गाय किंवा म्हैशींचे दूध पितात. पंरतु, शेळीचे दूध हे शरीरासाठी जास्त पोषक असते.
शरद पवारांच्या खास जवळच्या व्यक्तीनेच सोडला पक्ष
शेळीचे दूध फक्त आपल्या शारीरिक आरोग्यासाठीच चांगले नसते तर त्यामुळे आपले मानसिक आरोग्य देखील सुधारते. शेळीचे दूध (Sheep’s milk)पिल्याने आपली प्रतिकारक शक्ती वाढते. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण, जगातील तीन चतुर्थांश लोक शेळीच्या दुधाचे सेवन करतात. गायी म्हैशींच्या दुधाच्या तुलनेत शेळीचे दूध अधिक घट्ट असते.
उद्धव ठाकरेंची भाजपवर जहरी टीका; म्हणाले, “हा पक्ष आहे का चोरबाजार?”
शेळीच्या दुधाचे फायदे
1) शेळीचे दूध हे पचायला सोपे असते.
2) शेळीच्या दुधाने हृदयविकाराचा ( Heart Disease) धोका होत नाही.
3) शेळीच्या दुधाने हाडे अधिक मजबुत होतात.
4) या दुधात कॅलरीज, प्रोटीन्स, फॅट, कार्बोहायड्रेट, फायबर, शुगर, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम हे पोषक घटक मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात.
5) शेळीच्या दुधात मुबलक प्रमाणात विटामिन ए ( Vitamim A) असते.
6) हे दूध पिल्याने मोतीबिंदू आणि कर्करोगांसारख्या आजाराचा धोका देखील कमी होऊ शकतो.
7)कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी शेळीचे दूध फायदेशीर ठरते.