सांगलीच्या यात्रेमधुन एक आगळीवेगळीच माहिती समोर आली आहे. ती ऐकुण तुम्ही देखील हैराण व्हाल. सांगलीमधील आटपाडीत उत्तरेश्वर देवाच्या जत्रेत एक ५० लाखांचा बकरा आला आहे. या यात्रेमध्ये एका बकऱ्याची तब्बल ५० लाख रुपये बोली लागल्याची माहिती समोर आली आहे.
“..अरे, ही तर पापा की परी”, मॅडमचे ड्रायव्हिंग स्किल्स पाहून तुम्हीही व्हाल थक्क! पाहा VIDEO
मागच्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट होते पण आता हे संकट जरा कमी झाले आहे. त्यामुळे ब्बल २ वर्षानंतर मोठ्या प्रमाणात यात्रा भरत आहे. आटपाडीत उत्तरेश्वर देवाच्या यंत्रामध्ये जवळपास १० हजारांपेक्षा जास्त शेळ्या, मेंढ्या विक्रीसाठी आल्या आहे. या यात्रेत आलेल्या बकऱ्यांची किंमत पाच हजारांपासून पाच लाखांपर्यंत आहे. ही यात्रा दोन दिवस चालते. या यात्रेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते.
मोठीबातमी! दिपाली सय्यद करणार शिंदे गटात प्रवेश
माणदेशातील माडग्याळ जातीच्या बकऱ्याची किंमत जास्त महाग असते. या जातीतील सर्वात महाग बकऱ्याची किंमत ५० लाख रुपये आहे. त्यामुळे या बकऱ्यांची सर्वत्र चर्चा होत आहे.
सावकाराच्या त्रासाला कंटाळून घरातील पाच सदस्यांची आत्महत्या; वाचा सविस्तर