
Gogamedi massacre case । सुखदेव सिंग गोगामेडी हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी लेडी डॉन पूजा सैनी उर्फ पूजा बत्रा हिला जयपूरच्या प्रतापनगर येथून अटक केली आहे. या हत्याकांडातील दोन्ही शूटर्सना पोलिसांनी एक दिवस आधी अटक केली होती. पोलिसांच्या चौकशीत गोगामेडी यांच्या घरात घुसून गोळ्या झाडणाऱ्या मारेकऱ्यांनी अनेक गोष्टींची कबुली दिली असून, त्याआधारे आता या हत्येमध्ये सहभागी असलेल्या आणखी लोकांना अटक करण्यात पोलिस गुंतले आहेत.
Satara Accident News । साताऱ्यात ट्रक आणि ऊसाच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू
म्हणण्यानुसार, पूजा सैनी आणि तिचा पती महेंद्र कुमार उर्फ समीर हे लॉरेन्स गँगला शस्त्रे पुरवण्यात गुंतलेले आहेत. पोलिस सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, पूजाच्या अटकेमुळे शस्त्रास्त्रांच्या मोठ्या जाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. पूजा सैनी ही लॉरेन्स टोळीची हत्यार पेडलर होती. याआधीही लॉरेन्स गँगचे नाव समोर आलेल्या खुनात पूजा आणि समीरने हत्यारांचा पुरवठा केल्याचे पोलिसांनी सांगितले. कुणाला संशय येऊ नये म्हणून दोघेही एकत्र येऊन शस्त्रे पुरवत असत.
संभाजी ब्रिगेडच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कृषिमंत्र्याचे पुतळा दहन
पोलिसांनी त्यांच्या फ्लॅटची झडती घेतली तेव्हा त्यांना एके ४७ चे छायाचित्र आणि अनेक बनावट ओळखपत्रेही सापडली. पूजा आणि समीरने शूटर नितीनला आठवडाभर त्यांच्या फ्लॅटमध्ये आश्रय दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यांच्या फ्लॅटमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी राहत होते. त्यामुळे पूजाने नितीनला राहण्यासाठी स्वतःची खोली दिली. पूजा सैनीचा पती समीर सध्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा घेऊन घरातून फरार झाला आहे.
Breaking News | अर्जुन खोतकरांच्या कार्यकर्त्यावर भरदिवसा गोळीबार