Bhimashankar Temple । भीमाशंकरला दर्शनाला जाताय? एकदा ही नियमावली पहाच

Going to visit Bhima Shankar? Go through this rulebook once

Bhimashankar Temple । पुणे : मागील आठवड्यापासून राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे अनेक पर्यटक पर्यटनस्थळांवर (Tourist places) गर्दी करत आहेत. यापैकीच पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर (Bhimashankar) हे एक पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणी (Bhimashankar Temple Pune) राज्यभरातील हजारो पर्यटक येत असतात. विशेषतः श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याचे पाहायला मिळत असते. (Latest Marthi News)

Reserve Bank of India । मोठी बातमी! रिझर्व्ह बँकेने ‘या’ चार बँकांना ठोठावला दंड, केली मोठी कारवाई

जर तुम्हीही या ठिकाणी फिरायला जात असाल तर जरा थांबा. कारण देवस्थांनकडून एक नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांवर अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. जर तुम्हीही या ठिकाणी (Bhimashankar Tourist Place) जात असाल तर ही नियमावली एकदा जाणून घ्या. नाहीतर तुम्हाला मनस्ताप सहन करावा लागू शकतो.

मोठी बातमी! पालकमंत्रीपदाचा वाद टाळण्यासाठी सरकारमध्ये हालचाली सुरु, जाहीर केली नवीन यादी

सध्या अधिक-श्रावण महिना सुरू असल्याने या ठिकाणी भाविक गर्दी करू लागले आहेत. या ठिकाणी अनेक अनुचित प्रकार घडत असतात. याच पार्श्वभूमीवर देवस्थांनकडून मंदिर परिसरात मोबाईलवर बंदी घालण्यात आली आहे. दर्शनाला आलेल्या भाविकांनी गाभारा, मुख्य मंडप आणि मंदिर परिसरात छायाचित्रे काढू नये. त्यांनी मोबाइल बंद ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थांनच्या वतीने केले आहे.

Hera Pheri 3 | हेराफेरी 3 चित्रपटाबद्दल समोर आली मोठी अपडेट; चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

तसेच जर या आदेशाचे उल्लंघन केले तर त्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे.

Rahul Gandhi Flying Kiss । राहुल गांधींनी दिला फ्लाईंग किस, स्मृती ईराणी यांनी केला गंभीर आरोप

Spread the love