
गुजरात : आपल्या भारत देशत अनेक प्रकारचे सण उत्सव साजरे करण्यात येत असतात. अनेक सणांपैकी नवरात्र उत्सव (Navratri festival) हा एक महत्त्वपूर्ण सण आहे. संपूर्ण देशभरात नवरात्री उत्सव हा मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा करण्यात येतो. नवरात्री उत्सव हा नऊ दिवस चालतो. दरम्यान नागरिक गुजरातमध्येही (gujrat) नऊ दिवस नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करत आहेत. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवामुळे गुजरातमध्ये सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
Ajit Pawar: अजित दादा फडणवीसांकडून घेणार हे ट्रेनिंग?, केली मिष्किल टिप्पणी
दरम्यान या उत्साहाच्या वेळी भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा (Niraj Chopra) देखील नवरात्री उत्साहात साजरी करताना दिसला. नीरज चोप्रा गुजरातच्या वडोदरा येथे आयोजित नवरात्रीच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाला होता. दरम्यान यावेळी तिथे निरजने चाहत्यांसोबत गरबा (Garba) खेळण्याचा आनंद लुटला.
Satara: प्री-वेडींग शूट करायचय? मग आता सातारा बनतंय प्री-वेडींग डेस्टीनेशनचे माहेरघर
नीरज चोप्राचा हा गरबा खेळतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. नीरज चोप्राच्या या डान्सचा व्हिडिओ केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनीही शेअर केला आहे. अनुराग ठाकूर यांनी या व्हिडिओला कॅप्शनमध्ये दिले की, ‘गरबा ग्रुव नीरज चोप्रावर चालू झाला आहे. तू छान दिसत आहेस!’
हातावर सूज आलीय? मग ‘या’ उपायांनी मिळेल आराम