शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सरकार अनेक योजना (Government Schemes) राबवत असते. ज्याचा त्यांना खूप मोठा फायदा होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यातील काही योजनांची शेतकऱ्यांना (Farmers) माहिती नसल्याने त्याचा त्यांना लाभ घेता येत नाही. अनेकांचे जमिनीवरून वाद (Land disputes) होतात. काही वाद हे इतके टोकाला जातात की त्यामुळे गुन्हेदेखील घडल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. (Latest Marathi News)
Rahul Gandhi । ब्रेकिंग! राहुल गांधी पुन्हा दिसणार संसदेत, अखेर मिळाली खासदारकी..
सलोखा योजना येईल कामी
बऱ्याच वेळा १२ वर्षांपूर्वी शेजारील व्यक्ती किंवा भावकीतील जमिनीचा गट एकमेकांच्या नावे झाला तर त्यावर लवकर कोणताच उपाय निघत नाही. परंतु या समस्येवर उपाय निघाला आहे. आता अवघ्या एका तासात १२ वर्षांपूर्वीचा शेतीचा जुना वाद मिटणार आहे. शेतकऱ्यांना आता राज्य सरकारच्या ‘सलोखा’ योजनेचा लाभ घेता येणार आहे.
अवघ्या एक हजार रुपयात होईल काम
आनंदाची बाब म्हणजे त्यासाठी त्यांना एक हजार रुपये खर्च येणार आहे. एका तासात या शेतकऱ्यांना त्यांची जमीन मिळेल, अशी माहिती मुद्रांक शुल्क जिल्हाधिकारी गोविंद गिते यांनी दिली आहे. परंतु, अनेकांना सरकारच्या या योजनेची माहिती नाही. त्यामुळे ही योजना सुरु होऊनही अनेकजण त्याच्या लाभापासून वंचित राहिले आहेत.
जर तुम्हालाही हा जुना वाद मिटवायचा असेल तर तुम्ही तुमच्या गावात असणाऱ्या तलाठ्यांकडे जाऊन सलोखा योजनेतून अर्ज करू शकता. या अर्जानंतर तलाठी त्याठिकाणी जाऊन पंचनामा करून दोघांच्या संमतीने जमिनीचा अहवाल मुद्रांक शुल्क विभागाला सादर केला जाईल.