खुशखबर! आयटी क्षेत्रात 2 लाख तरुणांना नोकरीची संधी मिळणार

Good news! 2 lakh youth will get job opportunity in IT sector

अलीकडेच ट्विरचे सीईओ एलोन मस्क यांनी अर्ध्याहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. यानंतर मेटा सारख्या अनेक कंपन्यांमध्ये देखील कर्मचारी कमी करण्याची प्रक्रिया सुरू झाली. अशातच इन्फोसिस कंपनीने एक मोठी माहिती दिली आहे. या माहितीनुसार IT कंपन्यांमध्ये (Jobs in IT company) लाखो तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

Ajit Pawar: अजित पवारांच्या अडचणीत वाढ? शिखर बँक घोटाळा प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयामध्ये आज सुनावणी

जगविख्यात इन्फोसिस कंपनीचे ( Infosys) सह संस्थापक क्रिस गोपालकृष्णन यांनी याविषयी माहिती दिली असून, इन्फोसिस मध्ये 2 लाख तरुणांची भरती करण्यात येणार असल्याची आनंदवार्ता त्यांनी दिली आहे. यामुळं IT क्षेत्रात नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या सुमारे दोन लाख तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे.

शेतकऱ्यांना मोठा फटका; टोमॅटोच्या दरात घसरण

बेंगळुरु येथे पार पडलेल्या टेक समिटमध्ये ( Tech summit 2022) गोपालकृष्णन यांनी भारतीय आयटी क्षेत्राविषयी मत व्यक्त केले. तसेच यावेळी त्यांनी भारतीय आयटी क्षेत्राच्या गुणवत्तेविषयी, दर्जाविषयी देखील माहिती दिली. कोरोनानंतर झालेल्या डिजिटलयाझेशनमुळे जागतिक व्यापारात आणि व्यवसायात आयटी क्षेत्राला मागणी आली आहे. असे गोपालकृष्णन यांचे मत आहे.

मोठी बातमी! सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

आयटी क्षेत्रात सुरू असलेले राजीनामा सत्र थांबायला हवे. यावर सुद्धा गोपालकृष्णन यांनी मत व्यक्त केले आहे. अगामी काळात आयटी क्षेत्रात नोकऱ्यांची लाट येणार असल्याचे ऐकून आयटी कडे वळणाऱ्या तरुणांचा ओढा वाढेल. अशी गोपालकृष्णन यांना आशा आहे.

बिग ब्रेकिंग! मंत्रालयामध्ये तरुणाने केला आत्महत्या करण्याचा प्रयत्न; नेमकं काय असेल कारण?

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *