मुंबई : ग्राहकांसाठी पोस्ट ऑफिस दरवेळी नवनवीन योजना आणत असतात. अशातच पोस्ट ऑफिसने आणखी एक योजना आणली आहे ती म्हणजे SIP योजना. या योजनेत, तुम्ही एकरकमी रक्कम गुंतवून दरमहा तुमचे उत्पन्न मिळवू शकता. या योजनेमध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला 5000 रुपये उपलब्ध होतील. यासाठी आधी तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग्ज स्कीममध्ये एसआयपीद्वारे गुंतवणूक करावी लागेल. दरम्यान काही काळानंतर, गुंतवणूकदारांना मासिक उत्पन्न योजनेची (POMIS) संधी मिळते.
Rahul Gandhi: चक्क राहुल गांधी तमिळ मुलीशी लग्न करायला तयार, महिला कामगारांची घेतली भेट
6.6 टक्के दराने व्याज
सध्या पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न (monthly income) योजनेवर वार्षिक 6.6% व्याजदर मिळत आहे. जर तुम्ही या योजनेत 9 लाख रुपये जमा केले असतील तर वार्षिक 6.6 टक्के दराने 1 वर्षासाठी एकूण 59,400 रुपये व्याज मिळेल. ही रक्कम वर्षाच्या 12 महिन्यांत वितरित केली जाईल. अशा प्रकारे, प्रत्येक महिन्याचे व्याज सुमारे 4950 रुपये असेल. एकाच खात्यातून तुम्ही 4,50,000 लाख रुपये जमा केल्यास, तुम्हाला मासिक व्याज 2475 रुपये असेल.
Rohit Pawar: आमदार रोहित पवारांनी उपलब्ध केली एक लाख लंम्पी लस, ताबडतोब लसीकरणही झाले सुरू
असा घ्या फायदा
या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडावे लागेल. हे खाते उघडण्यासाठी सुरुवातीला 1000 रुपये रोख किंवा चेकद्वारे जमा करावे लागतील. तसेच डॉक्युमेंटमध्ये ओळखपत्र म्हणून आधार कार्ड किंवा पासपोर्ट किंवा मतदार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स (Driving license) आवश्यक आहे. यासोबतच 2 पासपोर्ट आकाराचे फोटो, सरकारने जारी केलेले ओळखपत्र किंवा युटिलिटी बिल पत्त्याच्या पुराव्यासाठी वैध आहे. पुढे तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन POMIS फॉर्म भरू शकता.त्यानंतर तुम्ही ते ऑनलाइनही डाउनलोड करू शकता. फॉर्म भरताना नॉमिनीचे नाव द्यावे लागेल.