Site icon e लोकहित | Marathi News

CNG Price : आनंदाची बातमी! सीएनजीचे दर सहा रु. प्रति किलो तर पीएनजीचे दर चार रु. प्रति किलो कमी

Good news! CNG rates are Rs.6. Per kg, the price of PNG is Rs. less per kg

मुंबई : सध्या महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सामान्य जनतेची आर्थिक स्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. आता वाढत्या महागाईमध्येच एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. सीएनजी (CNG Price) आणि पीएनजीचे दार कमी करण्यात आले आहेत. मुंबईमध्ये सीएनजीचे दर सहा रुपये प्रति किलो तर पीएनजीचे (PNG Price) दर चार रुपये प्रति किलो कमी झाले आहेत. तर पुण्यामध्ये सीएनजीचे दर चार रुपयांनी कमी करण्यात आले आहेत.

आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून हे नवे दर लागू करण्यात आले आहेत. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांसाठी ही एक आनंददायक बातमी आहे. तसेच या बातमीमुळे वाहन चालकांना देखील दिलासा मिळणार आहे. दर कमी झाल्यामुळे ग्राहक वर्गाला मुंबईमध्ये सीएनजी 80 रुपये प्रति किलो मिळणार आहे तर पीएनजी 48. 50 रुपयांना मिळणार आहे. त्याचबरोबर पुण्यामध्ये सीएनजी 87 रुपये प्रतिकिलो दराने मिळणार आहे.

सीएनजीच्या किमतीमध्ये घट –

मुंबईमध्ये सीएनजीचे दर सहारुपये प्रति किलो कमी करण्यात आले आहेत. तर पीएनजीचे दर चार रुपये प्रति किलो कमी करण्यात आले आहेत. त्याचबरोबर पुण्यामध्ये देखील सीएनजीच्या दरात चार रुपयांची कपात करण्यात आली आहे.

Spread the love
Exit mobile version