अतिवृष्टी झाल्याने राज्यात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने देखील अजूनही ओला दुष्काळ जाहीर केला नाहीय. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान या गोंधळात शेतकऱ्यांना एक दिलासा देणारी बातमी आलेली आहे. कापसाचे दर वाढल्याची माहिती बाजार समित्यांमधून समोर येत आहे. सध्याच्या स्थितीत ही गोष्ट शेतकऱ्यांसाठी आनंद देणारी असणार आहे.
कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित; महावितरणचा मोठा निर्णय
सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत कापसाला सरासरी प्रतिक्विंटल 9 हजार रुपये इतका भाव मिळत आहे. याकारणामुळे प्रत्येक समितीत कापसाची आवक वाढलेली पहायला मिळतीये. प्रत्येक बाजार समितीत किमान 100 वाहनांमधून एक हजार क्विंटल कापूस विक्रीसाठी येतोय. नंदुरबार ( Nadurbar Market Yard) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत महिनाभरापूर्वी मुहूर्ताच्या कापसाला 8 हजार 357 रुपये इतका भाव मिळाला होता.
मोठी बातमी! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील बबिताजी’चा अपघात
सध्या कापसाचे दर ( Cotton rates) वाढले असले तरी, हे दर अजून वाढतील अशी आशा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांनी अजूनही कापूस साठवून ठेवण्याचा निर्णय घेतलेला पहायला मिळतोय. मागील काही दिवसांत टोमॅटो व कांद्याचे घसरलेले दर यामुळे शेतकरी प्रचंड चिंतेत होते.परंतु आता कापसाचे दर वाढल्याने त्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.