शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकारकडून अनेक योजना राबविल्या जातात. यामुळे शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत होत असते. शेतीच्या कामासाठी पाणी पुरवठ्याची गरज ओळखून सरकारने वैयक्तीक विहिरीसाठी 4 लाखांचे अनुदान ( 4 lakh subcidy for river) देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला आहे. यातील लाभार्थ्यांना ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेत मंजुरी मिळवणे बंधनकारक आहे. या मान्यतेनंतर एका महिन्यात सगटविकास अधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता द्यावी व त्यानंतर १५ दिवसांत तांत्रिकी मान्यता देणे आवश्यक आहे.
राज्यामध्ये कोरोना निर्बंधाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा, म्हणाले…
विहरींच्या अनुदानासाठी दहापेक्षा अधिक लाभार्थ्यांनी अर्ज केल्यास विशेष ग्रामसभा घेऊन मंजुरी देण्यासाठी शासनाने ग्रामपंचायतींना आदेश दिले आहेत. राज्यात सध्या 3 लाख 87 हजार 500 विहरी खोदणे शक्य आहे. अशी माहिती भूजल सर्वेक्षणातून समोर आली आहे. त्यामुळे याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
साईबाबांच्या दर्शनाला जाताना आता मास्क वापरणे सक्तीचे: साई संस्थानचं आवाहन
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
1) सात-बारा उतारा
2) आठ-अ उतारा
3) जॉबकार्डची प्रत
4) सामुदायिक विहीर असल्यास सर्वांची मिळून किमान ४० गुंठे सलग जमीन असल्याचा पंचनामा
डिसेंबर नंतर सुद्धा गरिबांना मोफत रेशन मिळणार का? केंद्रीय मंत्र्यांनी दिली महत्वाची अपडेट
या योजनेचा लाभ घेण्यासाठी सात बारा उताऱ्यावर या आधी कुठल्याही विहरीची नोंद नसावी. तसेच अनुसूचित जाती-जमाती, भटक्या जमाती, दारिद्र्य रेषेखालील, महिला कर्ता असलेले कुटुंब, दिव्यांग व्यक्ती कर्ता असलेले कुटुंब, जमीन सुधारणांचे लाभार्थी यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. यासाठी ग्रामपंचायतीमध्ये ( Grampanchayat) जाऊन ऑनलाइन अर्ज भरणे आवश्यक आहे.