केंद्र सरकार आणि राज्य सरकार (Central Government and State Government) शेतकऱ्यांना आर्थिक फायदा व्हावा म्हणून अनेक योजना राबवत असते. यामध्येच कृषी क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरणाचा वापर वाढावा या अनुषंगाने देखील शासनाकडून अनुदान दिले जात आहे. शेतकऱ्यांना ‘एक शेतकरी एक अर्ज योजना अनेक’ या योजनेंतर्गत अनेक योजना राबविल्या जात आहेत. या अंतर्गत शेती अवजारांसाठी कृषी यांत्रिकीकरण योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेती अवजारे आणि ट्रॅक्टरसाठी अनुदान दिले जात आहे.
शेतकऱ्यांना दिवसाच वीज मिळावी; युवासैनिक आक्रमक
नेमकं किती अनुदान दिले जाईल?
शेतकऱ्यांना (farmer) ट्रॅक्टर आणि औजारांसाठी ५० ते ४० टक्के अनुदान दिले जात आहे. हे अनुदान अनुसूचित जाती जमाती व महिला शेतकरी व त्याचबरोबर अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान (grant) दिले जात आहे व इतर शेतकऱ्यांना ४० टक्के अनुदान दिले जात आहे. महाडीबीटी पोर्टलवर (MahaDBT Portal) शेतकरी कृषी विभागाच्या (Department of Agriculture) योजनांची माहिती मिळवून अर्ज करू शकतात.
७० वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात पडली १९ वर्षांची तरुणी; लव्हस्टोरी वाचून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित
‘असा’ करा अर्ज –
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन (Online) पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज (application) केल्यानंतर जे लाभार्थी पात्र आहेत अशा लोकांना अनुदान दिले जात आहे.
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त संजय राऊत भावूक; जुना फोटो शेअर करत म्हणाले…
पात्रता आणि अटी –
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी (farmer) अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
- एक शेतकरी फक्त एक ट्रॅक्टर घेऊ शकतो.
- शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
- जर शेतकऱ्याने याआधी कोणतेही कृषी अनुदान घेतले असेल तर तो ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.
- अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय १८ वर्षे असणे आवश्यक आहे.
- महत्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःची शेतजमीन असणे आवश्यक आहे.
आज आणि उद्या ऊसतोड बंद आंदोलन, कारखाने चालू ठेवल्यास संघर्ष होणार; राजू शेट्टींचा गंभीर इशारा