Site icon e लोकहित | Marathi News

खुशखबर! शेतकऱ्यांना आता सवलतीच्या दरात ड्रोन मिळणार; कृषिमंत्र्यांनी केली घोषणा

Good news! Farmers will now get discounted drones; Agriculture Minister announced

शेतीसाठी हवामान व पर्जन्यमान याचा अंदाज असणे फार आवश्यक असते. यानुसार शेतकऱ्यांना शेतातील कामाची आखणी करता येते. म्हणून हवामान व पर्जन्यमानाचा अचूक अंदाज माहिती असणे गरजेचे असते. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार ( Abdul Sattar) यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात दहा हजार पर्जन्यमापन यंत्रे बसविण्यात येणार आहेत. यामुळे हवामानाची अचूक माहिती रिअल टाईममध्ये मिळणार आहे. खरीप हंगामपूर्व बैठकीनंतर बोलताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय सांगितले आहेत.

Rishabh Pant । मोठी बातमी! ऋषभ पंत याच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर

महाराष्ट्रात सध्या २,२०० पर्जन्यमापन यंत्रे आहेत. मात्र ही यंत्रे हवामान अंदाजासाठी अपुरी असल्याने हा आकडा १० हजार पर्यंत नेण्याचा राज्यसरकारचा विचार आहे. यंदाच्या वर्षी मान्सून हंगामात ९६ टक्के पाऊस पडेल. यामुळे पाण्याची टंचाई भासणार नाही. तसेच शेतकऱ्यांना युरिया, बियाणे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होणार नाही. याची काळजी राज्य सरकार कडून घेतली जाईल. अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. ( Agriculture minister)

Gautami Patil । गौतमी पाटीलला चाहत्यांकडून खास गिफ्ट; सोशल मीडियावरची पोस्ट चर्चेत!

राज्यात नॅनो युरिया फवारण्यासाठी शेतकऱ्यांकडून ड्रोनचा वापर केला जाणार आहे. ( Drone For Nano Uria) मात्र यासाठी लागणारे ड्रोन शेतकऱ्यांकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना ड्रोन सवलतीच्या दरात पुरवले जाणार आहेत. तसेच ड्रोन चालकांना राहुरी कृषी विद्यापीठात १५ दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. असे देखील अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले.

‘चला हवा येऊ द्या’ मध्ये येणार गौर गोपाळ दास! ‘या’ दिवशी दिसणार एपिसोड…

Spread the love
Exit mobile version