अॅपल ( Apple) ही सर्वाधिक पसंतीची कंपनी म्हणून ओळखली जाते. अॅपलचे मोबाईल, लॅपटॉप व इतर डिव्हाइसेसना ग्राहकांमध्ये मागणी असते. अॅपल आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सतत नवीन फिचर्स आणत असते. ही कंपनी येत्या नवीन वर्षात काही नवीन उत्पादने लाँच करणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. यामध्ये अॅपल आयफोन 15 (Apple i phone15) सुद्धा लाँच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच आणखी नवीन फिचर्स 2024 मध्ये ग्राहकांच्या भेटीला येणार आहेत.
अजित पवारांचा सरकारवर निशाणा; साहित्य क्षेत्रातील हस्तक्षेपावर दर्शवला निषेध
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिसेंबर 2024 पासून अॅपलच्या स्मर्टफोनमध्ये यूएसबी टाइप सी चार्जिंग मिळणार आहे. याशिवाय अॅपल युजर्सना अँड्रॉइड युजर्सप्रमाणे थर्ड पार्टी अॅप स्टोअर्वरून अॅप्स डाऊनलोड करता येणार आहे. दरम्यान युरोपियन युनियनने एक कायदा केला असून त्याला डिजिटल गेटकिपर असे म्हंटले जाते. अॅप स्टोअर निवडण्यासाठी युजरला निर्णय घेऊ देणे आवश्यक असून थर्ड पार्टी सेवांनाही आयओएसमध्ये ( ios) भाग घेण्यासाठी संधी दिली पाहिजे, असे या कायद्यात सांगण्यात आले आहे.
हिवाळ्यात गुळ खाण्याचे फायदे; या आजारांतून होते सहज सुटका!
अॅपल ने युरोपियन युनियनचा हा कायदा पाळल्यास आयओएस युजर्सना (ios users) अँड्रॉइड युजर्सप्रमाणे हव्या त्या अॅप स्टोअर्सवरून अॅप डाऊनलोड करता येणार आहे. युरोपियन युनियनच्या कायद्यामुळे डेव्हलपर्सना देखील फायदा होणार आहे.
अॅप्लिकेशन पेमेंटमध्ये अॅपल 30 टक्के हिस्सा घेते. दरम्यान जर अॅपलने आयफोन आणि आयपॅड्समध्ये थर्ड पार्टी अॅप स्टोअर वापरू चालवू दिले तर डेव्हलपर्स ना इतर अॅप स्टोअरमध्ये अधिक कमिशन द्यावे लागणार नाही.
कापूस उत्पादक होणार आता मालामाल! महाराष्ट्रात राबविला जाणार ‘हा’ उपक्रम