Site icon e लोकहित | Marathi News

बुलेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Royal Enfield Bullet 350 लवकरच होणार लाँच

Good news for bullet lovers! Royal Enfield Bullet 350 will be launched soon

स्वतःच्या हक्काची एखादी भारी गाडी घेणे, हे प्रत्येक सामान्य माणसाचे स्वप्न असते. बाजारात अनेक ब्रँडच्या दुचाकी गाड्या आहेत. मात्र, यामध्ये रॉयल एनफिल्ड बुलेट (Royal Enfild) ही लोकांच्या हृदयावर राज करणारी गाडी आहे. या गाडीवरून फिरण्याचा मोह कुणालाच आवरत नाही. या गाडीचा थाटच लोकांना अगदी राजेशाही ( Royal) वाटतो. म्हणूनच गेल्या काही वर्षात रॉयल एनफिल्ड च्या विक्रीत वाढ झालेली पहायला मिळत आहे.

“हे सरकार काही महिन्यांचं नाही, काही दिवसांचं नाही तर काही तासांच….”, आदित्य ठाकरे यांचं भाकीत

दरम्यान, आता रॉयल एनफिल्ड लवकरच भारतामध्ये नव्या पिढीची बुलेट लाँच करण्यार असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे बुलेटप्रेमींची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. 2023 बुलेट 350 देशात परवडणाऱ्या किमतीत लाँच करण्याची शक्यता आहे. बुलेट 350 भारतात रॉयल एनफिल्डची सर्वात स्वस्त बाइक आहे. नवीन मॉडेलमध्ये चांगलं डिझाईन, अपडेटेड इंजिन त्याचबरोबर सेफ्टी फीचर्स असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच गाडी लॉंच होण्याच्या आधीच याची मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना दिसत आहे.

धक्कादायक घटना! ऊस तोडीतील अल्पवयीन मुलीवर मुकादमाच्याच मुलाने केला बलात्कार

माहितीनुसार, नवीन बाइकची स्टाइल क्लासिक 350 बाइकसारखी असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर स्टायलिश हँडलबार, राउंड मिरर, सिंगल सीट, पीशूटर एग्जॉस्ट आणि ट्यूबलर ग्रॅब रेल नव्याने असणार आहेत. त्याचबरोबर बाईकच्या इंजिनमध्ये देखील बदल केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच्या किमती बाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही मात्र सध्याच्या मॉडेलपेक्षा नक्कीच याची किंमत जास्त असेल.

बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळणार नाही, आमदार रोहित पवार यांनी केला मोठा दावा

Spread the love
Exit mobile version