Bike Loan | खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! आता सोप्या पद्धतीने मिळणार दुचाकीसाठी कर्ज

Good news for buyers! Now get a loan for two wheeler in an easy way

Bike Loan | सध्याच्या काळात दुचाकी (Bikes) वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. दररोज तुम्ही रस्त्यांवर अनेक दुचाक्या पाहत असाल. अनेक कंपन्या आपल्या पेट्रोल तसेच विजेवर चालणाऱ्या दुचाक्या लाँच करू लागल्या आहे. प्रत्येक कंपनीच्या दुचाकीमध्ये तुम्हाला वेगवेगळे फीचर्स आणि मायलेज (Bike Mileage) पाहायला मिळत असेल. परंतु सध्या भारतीय बाजारात दुचाकीच्या किमती (Bike Price Hike) वाढल्या आहेत त्यामुळे आता खरेदीदारांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे देऊन दुचाकी खरेदी करावी लागत आहे. (Latest Marathi News)

Ajit Pawar Birthday । सातवेळा आमदार आणि पाचवेळा उपमुख्यमंत्रीपद, जाणून घ्या राष्ट्रवादीतल्या फायरब्रॅण्ड नेत्याची कहाणी

प्रत्येकाकडे दुचाकी ख्ररेदीसाठी पुरेसे पैसे असतातच असे नाही. त्यामुळे अनेकजण दुचाकी कर्ज (Bike Loan) घेऊन खरेदी करतात. कर्ज घेणे खूप किचकट काम आहे. अनेकदा या कर्जामुळे दुचाकीस्वार अडचणीत येऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर आता लेक्ट्रिक्स ईव्हीने आपल्या अधिकृत वेबसाईटवर एक अनोखे इन्स्टंट लोन एलिजिबिलिटी टूल (Instant Loan Eligibility Tool) सुरू केले असून त्यामुळे तुम्हाला आरामात कर्ज मिळेल.

Devednr Fadanvis And Ajit Pawar Birthday । ‘ही दोस्ती तुटायची नाय’ अजितदादा आणि फडणवीसांचे नागपुरात झळकले बॅनर; सगळीकडे होतेय चर्चा

भारतीय बाजारात जास्तीत जास्त विजेवर चालणारी वाहने स्वीकारण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करवून देण्याच्या उद्देशाने, हे टूल तयार केले आहे. महत्त्वाचे म्हणजे यासाठी वित्तपुरवठा करत असणाऱ्या संस्थांपैकी एक, आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या सहयोगाने प्रस्तुत केलेले लेक्ट्रिक्सईव्ही डॉटकॉमवरील फ्री इन्स्टंट लोन एलिजिबिलिटी कॅल्क्युलेटर विडजेट ग्राहकांना त्यांचा सिबिल स्कोर फक्त ३ सहजसोप्या टप्प्यांमध्ये समजून घेण्यात मदत करणार आहे. त्यामुळे सोप्या पद्धतीने कर्ज मिळेल.

Manipur Violence । मणिपूरमधील काही जिल्ह्यांमध्ये अजूनही शांतात प्रस्थापित झालेली नाही, वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती

Spread the love