Site icon e लोकहित | Marathi News

New Rule । सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! जन्म दाखल्याने झटक्यात होणार कोणतंही काम

Good news for common people! Any work will be done in a flash with a birth certificate

New Rule । प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला काही नियम बदलत (Rules Change) असतात. यातील काही नियम सर्वसामान्य नागरिकांच्या फायद्याचे असतात तर काही नियम सर्वसामान्यांसाठी डोकेदुखीच कारण बनतात. लवकरच ऑक्टोबर महिना सुरु होणार आहे. या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून आधार कार्ड (Aadhar Card) आणि वोटर आयडीशिवाय (Voter ID) कोणतेही काम करणे शक्य होणार आहे. (Latest Marathi News)

Maharashtra Politics । ठाकरे गटाच्या ‘त्या’ खासदारांना शिंदे गट पाठवणार नोटीस, नेमकं कारण काय?

देशात 1 ऑक्टोबरपासून जन्म आणि मृत्यूची नोंदणी (सुधारणा) कायदा, 2023 (Registration of Births and Deaths (Amendment) Act 2023) लागू होणार आहे. त्यामुळे जन्म प्रमाणपत्राचं महत्त्व वाढेल. तुम्हाला आधार कार्डपासून ड्रायव्हिंग लायसन्सपर्यंतची सर्व महत्त्वाची कागदपत्रे कोणत्याही अडचणीशिवाय केवळ जन्म दाखल्याने (National Birth Certificate Rules) मिळवता येणार आहेत. त्यामुळे पूर्वी या कामासाठी बराच वेळ जात असायचा, परंतु आता सर्वसामान्यांची या समस्येतून सुटका होणार आहे.

Onion Rate । कांद्याला येणार अच्छे दिन? दिल्लीत होणार महत्त्वाची बैठक

लोकसभेत आणि राज्यसभेत विधेयकाला मंजुरी

दरम्यान, 1 ऑगस्ट रोजी लोकसभेत आणि 7 ऑगस्ट 2023 रोजी राज्यसभेत या विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारकडून याबाबत अधिसूचना जारी करत 1 ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू केला जाईल, असे जाहीर करण्यात आलं आहे. राज्य स्तरावर एकसमान डेटाबेस तयार करण्यासाठी मुख्य निबंधकांचीही नियुक्ती करण्यात येणार आहे.

Kangana Ranaut । कंगनाची होणार राजकारणात एन्ट्री? म्हणाली; “आगामी निवडणुकीत भगवा रंग…”

Spread the love
Exit mobile version