
CNG-PNG Price । मुंबई : देशात मागील काही दिवसांपासून इंधनाच्या किमती (Fuel Price) वाढल्या आहेत. परंतु त्याचा सर्वसामान्यांना खूप मोठा फटका बसत आहे. पूर्वीपेक्षा जास्त पैसे देऊन त्यांना इंधन खरेदी (Fuel Price Hike) करावी लागत आहे. दर वाढल्याने वाहनचालकांच्या खिशावर आर्थिक ताण येत आहे. त्यामुळे अनेकजण इलेक्ट्रिक वाहने (Electric vehicles) खरेदी करू लागले आहेत. अशातच आता सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. (Latest Marathi News)
Crop insurance । खुशखबर! पहिल्या टप्प्यात सव्वाकोटी शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा
ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झाली आहे आणि ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सीएनजी-पीएनजीचे (CNG-PNG) दर घसरले आहेत. काल मध्यरात्रीपासून दर बदलले आहेत. महानगर गॅस लिमिटेडने (Mahanagar Gas Limited) सीएनजीची किंमत 3 रुपयांनी तर पीएनजीची किंमत 2 रुपयांनी कमी झाले आहेत. याबाबत कंपनीने प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. (CNG-PNG Price in Mumbai)
Alibaug News । धक्कादायक बातमी! अंगावर वीज पडून पिता-पुत्राचा जागीच मृत्यू
मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाहने सीएनजी आणि पीएनजीवर धावतात. तसेच काहीजण स्वयंपाकघरात पीएनजीचा वापर करतात. नवीन दरानुसार सीएनजी 76 रुपये प्रति किलो आणि पीएनजी किंमत 47 रुपये प्रतिकिलो आहे. त्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु, व्यावसायिक गँस सिलिंडरच्या दरात 204 रुपयांची वाढ झाली आहे.