Petrol Price । सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! पेट्रोलचे दर होणार कमी, सरकारचा मोठा निर्णय

Good news for common people! Petrol prices will be reduced, a big decision of the government

Petrol Price । नवी दिल्ली : देशात मागील काही दिवसांपासून पेट्रोलच्या किमती खूप वाढल्या (Petrol Price Hike) आहेत. त्यामुळे आता वाहनचालकांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे देऊन पेट्रोल खरेदी करावे लागत आहे. अनेकजण तर पेट्रोलला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहने (Electric vehicles) खरेदी करू लागले आहेत तर कोणी अनेकजण खासगी वाहने टाळू लागले आहेत. परंतु, आता याच वाहनचालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच पेट्रोलचे दर कमी (Petrol Rate) होऊ शकतात. (Latest Marathi News)

Agriculture News । अनेक उपाय करूनही जनावर गाभण राहत नाही? हा घरगुती उपाय येईल कामी

केंद्र सरकार आता महागाई आटोक्यात यावी यासाठी एका योजनेवर विचार करत आहे. यात पेट्रोलवरील कर कमी करण्यासोबत खाद्यतेल आणि गव्‍हासारख्या अन्नधान्यावरील आयात शुल्क कमी होऊ शकते. सरकारी अधिकारी विविध मंत्रालयाच्या निधीमधून एक लाख कोटी रुपयांची तरतूद करण्याची शक्यता वर्तवली जात आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Asia Cup 2023 । जाहीर झाला आशिया कपचा संघ, कोणाला मिळाली संधी? जाणून घ्या

दरम्यान, मागील वर्षी केंद्र सरकारने महागाईपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी दोन लाख कोटी रुपयांचा खर्च केला होता. तसेच स्वातंत्र्यदिना दिवशी जनतेला संबोधित करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून महागाई कमी करण्याची ग्वाही देण्यात आली होती. अशातच २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्या आहेत. या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर महागाई नियंत्रणात आणणे हे केंद्र सरकारसमोर मोठे आव्‍हान असेल.

Maharashtra Rain Update । विदर्भात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

केंद्र सरकारचा आता निवडणुकांच्या तोंडावर किंमतीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न असेल. जर महागाई नियंत्रणात तर त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होईल. महागाई नियंत्रणात आल्याने त्यांच्यावर येणार आर्थिक ताण कमी होईल. त्यामुळे येत्या काळात महागाई नियंत्रणात येणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Success Story । इंजिनिअर शेतकऱ्याने पारंपारिक शेती सोडून सुरू केली बागायती शेती, सफरचंद शेतीतून लाखोंची कमाई

Spread the love