Cricket। आपल्यापैकी अनेकांना क्रिकेटचे (Cricket) वेड असेल. याच क्रिकेटप्रेमींसाठी (Cricket lovers) आता एक आनंदाची बातमी आहे. कारण त्यांचा आवडता खेळाडू पुन्हा एकदा मैदानात फलंदाजांचा धुव्वा उडवताना दिसणार आहे. लवकरच भारतीय संघाचा स्टार खेळाडू, वेगवान गोलंदाज आणि यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) कमबॅक करणार आहे. मागील अनेक दिवसांपासून तो मैदानापासून लांब होता. (Latest Marathi News)
अदानी समूहाची बदनामी करण्यासाठी हिंडनबर्गने चुकीचा रिपोर्ट दिला, गौतम अदानींचा गंभीर आरोप
त्याला टी-20 वर्ल्ड कप (T-20 World Cup), आशिया कप आणि आयपीएल अशा बड्या स्पर्धांमध्ये खेळात आले नव्हते. त्यामुळे चाहते त्याची आतुरतेने वाट पाहत होत. आता पुन्हा एकदा तो मैदानात उतरणार आहे. याबाबत बुमराहने (Bumrah) स्वत: एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) शेअर करत माहिती दिली आहे. त्यामुळे चाहत्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
Uddhav Thackeray । विधिमंडळातलं चित्र बदलणार?, उद्धव ठाकरेंना अजून एक मोठा धक्का बसणार?
या व्हायरल व्हिडीओमध्ये, बुमराह गोलंदाजी करत आहे. व्हिडीओच्या मागे इंग्रजी गाणं वाजत आहे. या गाण्याचा मराठीमध्ये असा होतो की, ‘सर्वांना सांगी मी घरी येत आहे.’ त्याने यामध्ये बीसीसीआयला (BCCI) टॅग केले असून आता त्याच्या या व्हिडीओमुळे चाहतावर्गात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. चाहत्यांना तो पुन्हा एकदा मैदानात दिसणार आहे.
दरम्यान मागील वर्षी सप्टेंबर महिन्यापासून बुमराह भारतीय संघाबाहेर आहे. कारण त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया केली आहे. नुकताच त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. त्यावरून तो पूर्णपणे बरा झाल्याचे दिसत आहे.
पती-पत्नीमधील कौटुंबिक वाद गेला विकोपाला, पतीने मध्यरात्री केले धक्कादायक कृत्य की …
हे ही पहा