
महागाई भत्ता कधी वाढेल? याकडे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष असते. दरम्यान सरकारने भत्त्यासंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता ८ टक्क्यांनी वाढवला आहे. हा मोठा निर्णय गुजरात सरकारने (Gujrat Government) घेतला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Bhpendra Patel) यांनी गुजरातमधील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
ऐकावं ते नवलच! अंडरवेअर वरून शेजाऱ्यांमध्ये भांडण, ८ जण जखमी; पाहा नेमकं काय आहे प्रकरण?
नुकतीच महागाई भत्त्यात केंद्र सरकारने वाढ केली आहे. यामध्ये वाढ करताना केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यांमध्ये ४ टक्क्यांनी वाढ केलेली होती. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना ४२ टक्के डीएचा (DA) लाभ दिला जाणार आहे. महागाई भत्त्यांमधील ही वाढ १ जानेवारी २०२३ पासून लागू करण्यात येणार आहे. यामध्ये बऱ्याच कर्मचाऱ्यांना फायदा होणार. राज्य सरकारने या संदर्भात आदेश जारी केला आहे. यामध्ये असे म्हंटले आहे की, याचा फायदा ९.५० लाख सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांना होणार आहे.
भत्त्यांमधील या वाढीमुळे अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळणार आहे. असं भूपेंद्र पटेल यांनी सांगितले आहे. महागाई भत्त्यांमध्ये यावर्षी एकाच वेळी दोनदा वाढ झालेली आहे. यामध्ये केलेली वाढ ही ८ टक्के असून ती दोन भागांमध्ये विभाजित केलेली आहे. पहिली वाढ ही १ जुलै २०२२ पासून करण्यात आली होती. आणि त्यामध्ये ४ टक्क्यांनी वाढ केली होती. तर दुसरीकडे १ जानेवारी २०२३ पासून केंद्र सरकार ही दुसरी वाढ करणार आहे. यामध्ये ४ टक्के वाढ होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा एकूण डीए ८ टक्क्यांनी वाढणार आहे. केंद्र सरकार बरोबर नुकतेच तमिळनाडू, (Tamilnadu) हिमाचल प्रदेश, (Himachal Pradesh) राजस्थान, (Rajasthan) आसाम (Assam) सरकारने देखील डीए मध्ये वाढ केली आहे.
विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली, अवघ्या काही तासातच लागणार 12वीचा निकाल; ‘या’ ठिकाणी पाहा निकाल
DA म्हणजे नेमकं काय?
पगाराच्या संदर्भात, ‘DA’ सामान्यत: “महागाई भत्ता” चा संदर्भ आहे. महागाई भत्ता हा कर्मचार्यांना महागाईमुळे वाढत्या जीवनमानाच्या खर्चाची भरपाई करण्यासाठी दिलेली अतिरिक्त रक्कम आहे. महागाई भत्ता मूळ पगाराच्या टक्केवारीनुसार मोजला जातो आणि स्थान, उद्योग आणि सरकारी नियम यासारख्या घटकांवर बदलू शकतो. हे सहसा सरकार किंवा नियोक्त्याद्वारे नियमित अंतराने सुधारित आणि घोषित केले जाते. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की भारतात महागाई भत्ता ही एक सामान्य संज्ञा असली तरी, भिन्न देशांच्या समान संकल्पनांसाठी त्यांच्या स्वतःच्या संज्ञा असू शकतात. म्हणून, पगारातील ‘DA’ चा अर्थ तो वापरला जात असलेल्या देश आणि संदर्भानुसार बदलू शकतो.
Emergency Call | इमर्जन्सी कॉल कसा कनेक्ट होतो माहिती आहे का ? जाणून घ्या अधिक…