
मुंबई : राज्यभरातील नियमितपणे परतफेड करणाऱ्या २८ लाख शेतकऱ्यांना (Farmer) प्रत्येकी ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. बॅंकांनी (Bank) दिलेल्या याद्यांची छाननी आता पूर्ण झालीये. आधार प्रमाणीकरणानंतर अंतिम याद्या प्रसिद्ध होऊन १५ दिवसांत अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
सणासुदीच्या मुहूर्तावर झेंडूची फुले महागणार; किलोचा भाव १००च्या आसपास जाण्याची शक्यता
२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस (Devendr Fadanvis) मुख्यमंत्री होते त्याकाळी शेतकऱ्यांना दीड लाखांची कर्जमाफी दिली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने दोन लाखांची कर्जमाफी दिली. त्याचबरोबर नियमित कर्जदारांच्या प्रोत्साहन अनुदानामध्ये देखील २५ हजारांची वाढ केली. पण, सरकारच्या तिजोरीमध्ये पैसाच नव्हता. त्यामुळे कर्जाची नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना अडीच वर्षे वाट पाहावी लागली.
Rahul Gandhi: राहुल गांधींनी शरद पवार स्टाईलने मुसळधार पावसात दिल भाषण, व्हिडीओ व्हायरल
मुख्यमंत्री शिंदेनी (CM Shinde) आधीच्या नियमामध्ये काही बदल करीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय . २०१७-१८ ते २०१९-२० या दोन तीन वर्षांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली असल्यास त्यांना अनुदान देण्याचा निर्णय झालाय. २०१९ मध्ये अतिवृष्टी, महापुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ दिला जाणार आहे. आता लवकरच याची अंतिम यादी देखील जाहीर होणार आहे.
केंद्र सरकारने लॉन्च केले ‘जलदूत ऍप’, आता शेतकऱ्यांना मिळणार विहीरींच्या पाणी पातळीची माहिती