Site icon e लोकहित | Marathi News

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सौर पंपासाठी मिळणार 90 टक्के अनुदान

Good news for farmers! 90 percent subsidy for solar pump

शेतीसाठी पाण्याचा पुरवठा ( Water supply) व्यवस्थित होणे गरजेचे असते. मात्र बऱ्याचदा सिंचन सोयी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. यावर उपाय म्हणून सरकारने शेतकऱ्यांसाठी खास योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर सौरपंप दिले जाणार आहेत. ‘पंतप्रधान कुसूम योजना’ असे या योजनेचे नाव असून या योजनेमुळे शेतकऱ्यांची सिंचनाची समस्या दूर होऊ शकते. यामुळे या योजनेचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

मोठी बातमी! शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया होणार

राज्य सरकार पंतप्रधान कुसुम योजनेंतर्गत ( PM Kususm Yojana) राज्यातील शेतकऱ्यांना सौर पंपांचं वाटप करणार आहे. याचा लाभ राज्यातील 5 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे विदर्भातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ प्राधान्याने मिळणार आहे. या जिल्ह्यातील दुष्काळी अवस्थेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना सौर पंपासाठी फक्त 10 टक्के खर्च करावा लागणार आहे. उर्वरित 90 टक्के अनुदान केंद्र सरकार, राज्यसरकार व वित्तीय संस्था यांच्याकडून मिळणार आहे.

शरद पवार–देवेंद्र फडणवीस यांच्या एकत्र गाडीतील प्रवासाबाबत राऊतांच मोठं विधान; म्हणाले…

पंतप्रधान कुसुम योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करावा लागणार आहे. मात्र पारंपरिक वीज कनेक्शन नसणारे, पाण्याचा कुठलाही स्रोत उपलब्ध नसणारे शेतकरीच यासाठी अर्ज करू शकतात. तसेच अटल सौर कृषी पंप योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेतलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र नाहीत.

‘या’ कारणामुळे शिंदे, फडणवीस, आणि ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसणार! चर्चाना उधाण

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे?
१) पासपोर्ट फोटो
२) आधार कार्ड
३) बँक पासबुक फोटो
४) जातीचा दाखला.
शेतकरी अधिक माहितीसाठी pmkusum.mnre.gov.in या वेबसाईटला भेट देऊन या योजनेची सविस्तर माहिती मिळवू शकता.

वेड चित्रपटाने खरंच वेड लावलय! पहिल्याच आठवड्यात कमावले ‘इतके’ कोटी रुपये; वाचून बसेल धक्का

Spread the love
Exit mobile version