Site icon e लोकहित | Marathi News

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ यंत्रासाठी मिळणार कोटींचे अनुदान

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'या' यंत्रासाठी मिळणार कोटींचे अनुदान

काळ बदलत जातोय तशी तंत्रज्ञानात प्रगती होत आहे. तंत्रज्ञानामुळे माणसांच्या वेळेची व कष्टाची बचत होत आहे. दरम्यान सध्या प्रत्येक क्षेत्रात यंत्रांचा वापर वाढला आहे. शेतीत सुद्धा मोठ्या प्रमाणात यंत्रे वापरली जातात. ट्रॅक्टर, ऊसतोडणी यंत्र, पॉवर ट्रेलर यांसारखी यंत्रे शेतीसाठी वापरली जातात. यामुळे मोठ्या प्रमाणात मजूरटंचाई भासत नाही. शेतीसाठी ( Farming ) शेतकऱ्यांना अवजारे उपलब्ध व्हावीत यासाठी सरकार देखील प्रयत्न करत असते. नुकतेच केंद्र सरकारने ( Central Government) राज्याला ऊस तोडणी यंत्र अनुदानासाठी निधी मंजूर केला आहे.

महत्वाची बातमी! शिंदे-फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय

ऊस तोडणी यंत्र शेतकऱ्यांना सहज उपलब्ध व्हावे यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यासाठी विशेष भाग म्हणून निधी दिला आहे. या ऊस तोडणी यंत्र अनुदान ( Subsidy) योजनेसाठी 192 कोटी 78 लाख रुपये केंद्र शासनाकडून मंजूर झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे ही मंजुरी सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यामध्ये राज्य शासनाचा 128 कोटींचा हिस्सा राहणार आहे. तसेच राज्य व केंद्र सरकार मिळून या योजनेसाठी 320 कोटी रुपये देणार आहेत.

बिहारमध्ये आहे चक्क आयआयटीयन्सचे गाव! इथल्या तरुण पोरांची ‘ही’ कमाल नक्की वाचा

ऊस तोडणी यंत्रासाठी देण्यात येणाऱ्या या निधीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात नवीन 900 ऊस तोडणी यंत्र उपलब्ध होतील. वैयक्तिक शेतकरी, उद्योजक आणि साखर कारखाने या यंत्राचा लाभ घेऊ शकणार आहेत. महाराष्ट्रातील ऊसतोड यंत्रांची सध्याची परिस्थिती पाहता 800 ते 825 ऊस तोडणी यंत्र उपलब्ध आहेत. यामध्ये आता नव्याने 900 ऊस तोडणी यंत्रासाठी 320 कोटींचे अनुदान मिळणार असल्याने राज्यात 1700 पेक्षा अधिक ऊस तोडणी यंत्र उपलब्ध होणार आहेत.

मोठी बातमी! महावितरणच्या गलथान कारभारामुळे संतोष मुंडेचा मृत्यू

Spread the love
Exit mobile version