शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ कारणांमुळे कांद्याचा भाव 20 ते 30 टक्क्यांनी वाढणार

Good news for farmers! Due to 'these' reasons the price of onion will increase by 20 to 30 percent

गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या (Farmers) खरिपातील कांद्याचे (Kharif onions) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्याचा जीव रडकुंडीला आला आहे. कारण सध्या कांद्याला मिळत असलेल्या भावामध्ये कांदा (Onions) लागवडीला आलेला खर्चही निघत नाही. महाराष्ट्र (Maharashtra), मध्य प्रदेशात कांद्याची अवस्था वाईट झाली आहे. कारण येथे कांदा शेतकऱ्यांना अत्यंत कमी दराने कांदा विकावा लागतोय.

Prajakta Mali: “…त्याचा प्रवास तर फारच ह्रदयाजवळचा आहे”, प्राजक्ता माळीची ती इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत

कांद्याची अवस्था पाहून भाजी मंडईशी संबंधित लोकही चिंता व्यक्त करत आहेत. दरम्यान आता लवकरच कांद्याच्या किमती कडाडणार आहेत. भाजी मार्केट आळी असोसिएशनचे अध्यक्ष खुशी राम लोधी यांनी सांगितले की, एकूण कांदा उत्पादनात कांद्याचा वाटा 70 टक्के आहे, तर खरीप कांद्याचा वाटा 20 टक्के आहे आणि उशिरा कांद्याचा वाटा 10 टक्के आहे. दरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आणि यामुळे का कांद्याची मुळे खराब होत आहेत.

Devendra Fadnavis: पीएफआय’वर भारतात बंदी! देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देत केला मोठा खुलासा, म्हणाले…

त्याचा तोटा म्हणजे खरीप हंगामात कांद्याचे उत्पादन कमी होईल. महाराष्ट्र, कर्नाटकात याआधीच भरपूर पाऊस झाला आहे. बिहार, उत्तर प्रदेशात गेल्या चार दिवसांपासून पावसाने परिस्थिती दयनीय बनवली आहे. शेतकऱ्यांना सध्या बाजारात 10 ते 15 रुपये किलो कांद्याला भाव मिळत आहे. दरम्यान याच कांद्याची बाजारात 25 ते 30 रुपये किलोने विक्री होत आहे.

Raj Thackeray: लता मंगेशकरांच्या जयंती निमीत्त राज ठाकरे भावुक; पोस्ट शेअर करत म्हणाले,“दीदी जिथे असतील तिथे…”

महाराष्ट्र, मध्य प्रदेशात कांद्याला फटका

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात कांदा जास्त आला किंवा उत्पादन घटले. दरम्यान त्याचा परिणाम संपूर्ण देशात दिसून येतो. कारण यंदा खरीप हंगामात कांदा 20 ते 30 टक्के अधिक आहे. पावसामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात कांद्याला अधिक फटका बसला आहे. या राज्यांमध्ये उत्पादन घटले तर साहजिकच कांद्याचे भाव वाढतील.

Eknath Shinde: ‘पीएफआय’वर भारतात बंदी! एकनाथ शिंदेनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

कांद्याचे 2021-22 मध्ये विक्रमी उत्पादन

कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2020-21 मध्ये 266 लाख टन कांदा होता. 2021-22 मध्ये कांद्याचे उत्पादन 19 टक्क्यांनी वाढले. त्यात वाढ होऊन ती 317 लाख टन झाली. त्यातच एक विक्रम केला. विक्रमी उत्पादनामुळेच कांदा स्वस्त झाला. दरम्यान
यावेळी कांद्याचे भाव महागण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळू शकतो.

Eknath Shinde: शिवभोजन थाळी योजना बंद करण्याचा निर्णय अद्याप नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *