राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यांनतर पहिलाच अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत.
शरद पवार यांच्या दौऱ्याला लोकांनी केला विरोध, पाहा नेमकं काय म्हणाले?
बऱ्याचवेळा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या पिकाचं नुकसान होतं. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास जातो. अशा शेतकऱ्यांना पिकविमा लवकर मिळावा यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. याशिवाय आता राज्य सरकारने 1 रुपयात पीकविमा देखील आणला आहे. आजच्या बजेटमध्ये याबाबत घोषणा देखील करण्यात आली आहे. शेतकर्यांना फक्त 1 रुपयांमध्ये पीकविमा देणार असून त्यासाठी आता 3312 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार आहे.
तुटलेल्या विद्युत तारेत अडकून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
अर्थसंकल्पातील काही महत्वाच्या घोषणा –
१) केंद्र सरकारचे 6 हजार आणि राज्याचे 6 हजार असे मिळून शेतकऱ्याला प्रत्येक वर्षी 12 हजार रुपये मिळणार.
२) राज्यातील शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयामध्ये पीक विमा मिळणार.
३) 10 लाख घरांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम
४) महिला वर्गाला एसटीमध्ये ५० टक्के सूट
५) अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये वाढ
६) महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत, 5 लाखांपर्यंत उपचार करता येणार.
७) निराधार योजनांमध्ये वाढीव अर्थसहाय्य मिळणार
८) गुढीपाडव्याला १ कोटी ६३ लाख शिधाधारकांना आनंदाचा शिधा मिळणार.
९) शिक्षणसेवकांच्या मानधनामध्ये वाढ.
१०) शेतकऱ्यांना कर्जमाफी.
“अर्थसंकल्प म्हणजे ‘बड्या-बड्या बाता अन्…”, शेतकरी नेते रविकांत तुपकर संतापले