
कडक उन्हामुळे व अचानक पाऊस पडल्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी निराश ( Farmers disappointed) झाला आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीआधी प्रति एकरमागे दहा हजार रुपये देण्याचा निकष विभागीय आयुक्तांकडून सरकारला देण्यात आला आहे. या निर्णयावर सरकार काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. या ठरावावर सरकार देखील सकारात्मक बाजूने निर्णय देईल असे मत राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मांडले आहे. यामुळे हा निर्णय लवकर घेण्यात यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
अब्दुल सत्तार बुधवारी (17 मे) पालघर (Palghar) जिल्ह्यातील चिंचणी येथे शेतकरी मेळाव्यात उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी मत व्यक्त केले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या या मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे 25 पेक्षा जास्त उपाययोजना करणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी सांगितले. व शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या उपाययोजना देखील उपलब्ध होतील . यामुळे सर्व शेतकरी बांधवांचे याकडे लक्ष वेधले आहे.
राज्य सरकार शेतकऱ्यांबाबत संवेदनशील आहे आणि शेतकऱ्यांसाठी जेवढ्या जास्त उपाययोजना करता येतील त्या आम्ही करू, असे देखील मत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केल आहे. व तसेच पालघर मध्ये होत असणारा युरियाच्या काळाबाजार हा रोखण्यासाठी सरकार तंतोतंत प्रयत्न करत आहे असे आश्वासन अब्दुल सत्तार यांना शेतकऱ्यांना दिलं आहे.