Tractor Loan । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ट्रॅक्टरसाठी सरकार देतंय कर्ज, या सोप्या पद्धतीने करा अर्ज

Good news for farmers! Govt is giving loan for tractor, apply in this easy way

Tractor Loan । भारतात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, पूर यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांना बँकेकडून किंवा सावकाराकडून जास्त व्याजदरावर कर्ज (Bank Loan) घ्यावे लागते. याच पार्श्वभूमीवर केंद्र (Central Government) आणि राज्य सरकार (State Government) शेतकऱ्यांसाठी सतत विविध योजना (Government scheme) राबवत असते. ज्याचा देशातील लाखो शेतकरी लाभ घेत असतात. (Latest Marathi News)

Sharad Pawar । शरद पवारांना पुन्हा मोठा धक्का! बड्या नेत्याच्या मुलाने केला अजित पवार यांच्या गटात प्रवेश

सध्या शेती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरचा वापर केला जात आहे. अनेकांकडे ट्रॅक्टर नसतो, त्यामुळे ते भाड्याने ट्रॅक्टर घेतात. परंतु जर तुम्ही भाड्याच्या ट्रॅक्टरला कंटाळला असाल आणि नवीन ट्रॅक्टर खरेदी करण्याच्या तयारीत असाल तसेच तुमच्याकडे पैशाची कमतरता असेल तर बातमी तुमच्या कामाची आहे. कारण सरकार आता ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी सरकार तत्काळ ट्रॅक्टर कर्ज (Tractor Loan) या योजनेअंतर्गत कर्ज देत आहे.

Yuvraj Singh । प्रसिद्ध क्रिकेटपटू युवराज सिंहच्या आईला धमकी, 40 लाख रुपये द्या नाहीतर… ‘

या योजनेअंतर्गत, SBI बँक (SBI Tractor Loan) आता शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर 80 टक्क्यांपर्यंतचे कर्ज देत आहे. याचाच अर्थ असा की तुम्हाला ट्रॅक्टर खरेदीसाठी ट्रॅक्टरच्या एकूण किमतीच्या केवळ 20 टक्के रक्कम भरावी लागणार आहे. तसेच उरलेली 80 टक्के रक्कम कर्जाची असणार आहे. यासाठी काही नियम आणि अटी आहेत.

Kolhapur Flood | ब्रेकिंग! कोल्हापूरमध्ये पूरस्थिती? पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने मोठी वाढ

हे लक्षात घ्या की ट्रॅक्टरसाठी त्यांचा कर्ज घेता येईल जे भारताचे रहिवासी आणि त्यांचे सरासरी वार्षिक उत्पन्न दहा लाख रुपये आहे. तसेच शेतकऱ्याकडे दोन किंवा त्या पेक्षा जास्त एकर लागवडीयोग्य जमीन असावी. महत्त्वाचे म्हणजे समजा तुमचे वार्षिक उत्पन्न दहा लाखांहून अधिक असल्यास तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही.

Manipur Violence । धक्कादायक घटना! मणिपूरमध्ये बीएसएफ जवानाकडून महिलेचा विनयभंग; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

त्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, जमिनीशी संबंधित कागदपत्रे तसेच रहिवासी प्रमाणपत्र आणि 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट गरजेचे आहे. मोबाईल क्रमांक आणि दोन पासपोर्ट फोटो महत्त्वाचे आहेत. कर्ज घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन संबंधित कर्मचाऱ्याकडून ट्रॅक्टर कर्जासाठी संबंधित फॉर्म घ्यावा लागणार आहे. यात तुम्हाला तुमचे नाव, पत्ता, पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक अचूक भरून तो बँकेत जमा करा. बँक तुमचा फॉर्म तपासून एका प्रक्रियेनंतर तुम्हाला ट्रॅक्टरसाठी कर्ज मिळेल.

वालचंदनगर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा

Spread the love