
देशाचा अर्थसंकल्प लवकरच मांडला जाणार आहे. या अर्थसंकल्पात नक्की काय असणार? याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अगामी अर्थसंकल्पात (Budget 2023) शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मिळणार आहे. यामध्ये सरकार किसान सन्मान निधी योजनेतील रक्कम वाढवणार असल्याची माहिती समोर येत आहे. ही रक्कम सहा हजारहून आठ हजार होण्याची शक्यता आहे.
“भसाडा आवाज आणि…”, अमृता फडणवीसांचे नवीन गाणे रिलीज होताच नेटकरी संतापले
येत्या 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmla Seetaraman) देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. यामध्ये निवडणुकांच्या दृष्टीने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) या योजनेवर सर्वाधिक भर देण्यात येणार आहे. या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 3 टप्प्यात जमा होतात. मात्र इथून पुढे ते सहा टप्प्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणून यामध्ये 2 हजार रुपयांची वाढ पहायला मिळणार आहे.
Video: रणबीर कपूरने फेकून दिला चाहत्याचा फोन; संतापलेले नेटकरी म्हणाले हा कोणता माज?
मागील दोन वर्षात कोरोनामुळे आर्थिल क्षेत्रात मोठी मंदी आली होती. भारताच्या अर्थव्यवस्थेवर याचा मोठा परिणाम झाला होता. दरम्यान यातून सावरल्यानंतर आता नवीन अर्थसंकल्प सादर होतोय. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या अर्थसंकल्पात शिक्षण, शेती, उद्योग व व्यवसायांच्या दृष्टीनकोनातून काय नवीन योजना असतील. याबाबत लोक प्रचंड उत्सुक आहेत.