मुंबई : भारत हा कृषिप्रधान देश आहे. दरम्यान शेती व्यवसायाच्या (Farming) सुरवातीपासूनच मोठ्या प्रमाणात पशुपालन (Animal Husbandry) केले जात आहे. तसेच सरकारकडून पशुपालक शेतकऱ्यांचे (farmer) उत्पन्न वाढवण्यासाठी (Government) अनेक नवनवीन योजना आणल्या जातात. दरम्यान सरकारने एक अशी योजना आणली आहे, ज्यामध्ये 10 म्हशींची डेअरी उघडण्यासाठी पशुधन विभागाकडून 7 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. भारत सरकार दूध उत्पादनाला चालना देण्यासाठी ‘डेअरी उद्योजक विकास योजना’ (‘Dairy Entrepreneur Development Scheme) यासारख्या विविध योजना राबवत आहे. भारत सरकारने 1 सप्टेंबर 2010 पासून ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय उघडण्यासाठी शासनाकडून अनुदानाचा लाभ दिला जातो.
मोठी बातमी! राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ भागात दिला रेड अलर्ट
खरतर दुधाच्या उत्पादनात भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे आणि इथे दुग्धोत्पादन हे खेड्यात राहणाऱ्या लोकांच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. यामुळे जर तुम्हाला डेअरी उघडायची असेल तर आपण या कर्जाचा लाभ घेऊन व्यवसाय सुरू करू शकता. जर कर्जाची रक्कम एक लाखापेक्षा जास्त असेल तर कर्जदाराला त्याच्या जमिनीशी संबंधित कागदपत्रे गहाण ठेवावी लागतील. महत्वाचं म्हणजे , तुम्हाला या योजनेंतर्गत कर्ज घेण्यासाठी व्यावसायिक बँका, प्रादेशिक बँका, राज्य सहकारी बँका, राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँका आणि नाबार्डच्या अनुदानासाठी पात्र असलेल्या इतर संस्थांशी संपर्क साधावा लागेल.
खुशखबर! पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत मिळतील दरमहा 5000 रुपये
बँकेच्या कर्जावर मिळणार सबसिडी
या योजनेंतर्गत सर्वसाधारण श्रेणीतील दुग्धशाळा चालकांना 25% अनुदान तसेच महिला आणि अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 33 % अनुदान दिले जाणार आहे. महत्वाचं म्हणजे या योजनेमध्ये तुम्हाला फक्त 10 टक्के पैसे गुंतवावे लागतील आणि उर्वरित 90 टक्के रक्कम बँक कर्ज आणि सरकारकडून सबसिडीद्वारे पुरवली जाईल.
Rahul Gandhi: चक्क राहुल गांधी तमिळ मुलीशी लग्न करायला तयार, महिला कामगारांची घेतली भेट
कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
१)अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे आधार कार्ड, पॅनकार्ड असणे आवश्यक आहे.
२) अर्जदार मागास जातीचा असाल तर अर्जदाराकडे जात प्रमाणपत्रही असायला हवे.
३) अर्जदाराच्या खात्याचा रद्द केलेला चेक असावा.
४) एक असही प्रमाणपत्र सादर करावे लागेल, जेणेकरून कोणत्याही बँकेचे कर्ज थकीत नाही हे समजेल.