
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मागच्या काही दिवसांपासून कांद्याचा दरामध्ये चांगलीच घसरण झाली होती पण आता कुठेतरी कांद्याला समाधानकारक दर मिळत आहे.
धक्कयादक! बारामतीमधील भिगवण रोडवर पत्रकारावर गोळीबार
राज्यातील वेगेवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कांद्याच्या बाजारभावानुसार कांद्याला सर्वात जास्त चार हजार रुपये दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये (Farmer ) समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. हा बाजारभाव सोलापूर व पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Solapur Agricultural Produce Market Committee) कांद्याला किमान भाव 100 रुपये, तर कमाल भाव 4000 रुपये असून सर्वसाधारण भाव 1500 रुपये आहे.
राज्य सरकारचा मोठा निर्णय! महावितरणाला दिले शेतकऱ्यांची वीज न कापण्याचे आदेश
त्याचबरोबर अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Ahmednagar Agricultural Produce Market Committee) 52 हजार 434 क्विंटल कांदा आवक झाली असून यासाठी किमान भाव 1800, तर कमाल भाव 3400 असून सर्वसाधारण भाव 2600 इतका आहे.
अरे बापरे! मांजराने धु..धू..धुतलं कुत्र्याला; पाहा व्हायरल VIDEO