Site icon e लोकहित | Marathi News

Onion Subsidy । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच मिळणार कांद्याचं अनुदान

Good news for farmers! Onion subsidy will be available soon

Onion Subsidy । राज्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याचे (Onion) उत्पादन घेतले जाते. परंतु, दरवर्षी कांद्याला भाव (Onion Rate) मिळतातच असे नाही. अनेकदा या शेतकऱ्यांना कांद्याला चांगले भाव मिळत नसल्याने कांदा फेकून द्यावा लागतो. यावर्षीही कांद्याचे दर प्रचंड घसरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर दिवस रात्र मेहनत करून पिकवलेला कांदा सडू देण्याची वेळ आली आहे. (Latest Marathi News)

IMD Weather Forecast । सावधान! पुण्यासह ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा, घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

याच पार्श्वभूमीवर प्रती क्विंटल 350 रुपये प्रमाणे 200 क्विंटलपर्यंत प्रति शेतकरी सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता. परंतु, अजूनही शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी नाराज झाले आहेत.”अनुदानासाठी वित्त विभागाने पणन विभागास 465 कोटी 99 लाख रुपये निधी वितरीत केला आहे. लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्याची प्रक्रिया सुरु होईल”, अशी माहिती पणन मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी दिली आहे.

Mukesh Ambani । अखेर झाली घोषणा! ‘या’ दिवशी जिओचा शेअर करणार बाजारात धमाका

या अनुदानासाठी लाल कांदा उत्पादक, लेट खरीप कांदा उत्पादक अशा सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या मागण्या पणन विभागाकडे आल्या आहेत. यात 23 जिल्ह्यांमधून कांदा अनुदान मागणी प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यापैकी 13 जिल्ह्यातील अनुदानाची मागणी अल्प स्वरुपाची आहे. उरलेल्या 10 जिल्ह्यांची मागणी जिल्हा निहाय 10 कोटीपेक्षा जास्त आहे, असेही सत्तार यांनी स्पष्ट केले आहे.

गणोशोत्सव, दिवाळीत 100 रुपयात आनंदाचा शिधा, गोरगरीबांना सणासुदीत मोठा दिलासा; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

Spread the love
Exit mobile version