राज्यातील शेतकरी सध्या अनेक संकटांना तोंड देत आहेत. या परिस्थितीत महावितरणने वसुली कार्यक्रम सुरू केला आहे. इतकंच नाही तर थकीत वीजबिल असणाऱ्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात येत आहे. ऐन रब्बी हंगामात ( Rabbi Season) पिकांना जेव्हा पाण्याची जास्त गरज आहे, अशा वेळी महावितरण ने ‘नाक दाबून तोंड उघडण्याची’ भूमिका घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता या संकटाचा सामना करावा लागत आहे. यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे.
ब्रेकिंग! भगतसिंग कोश्यारींची राज्यपाल पदावरुन होणार हकालपट्टी?
महावितरणच्या या वीज तोडणी कार्यक्रमामुळे जे शेतकरी नियमित वीज बील ( Electricity Bill) भरत आहेत, तसेच ज्यांनी चालू महिन्याचे शेतपंपाचे बील भरले आहे त्यांना देखील याचा चांगलाच फटका बसत आहे. यामुळे सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. या शेतकऱ्यांना सूट देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांनी दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
“मला काही झालं तर…”, संजय राऊतांचा राज्य सरकारला गंभीर इशारा
यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना बराच आर्थिक भार देखील सहन करावा लागतोय. यामुळे त्यांना थकीत वीजबिले भरणे शक्य नाहीत. अशातच वीज तोडणी झाल्याने शेतकऱ्यांचे आणखी नुकसान होणार आहे.
कोट्यावधी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या विराट-अनुष्का कडे आहेत ‘या’ कोट्यवधी गोष्टी